25 C
Mumbai
Sunday, December 15, 2024
घरसंपादकीयमतदारांनीच दिली शरद पवारांना सक्तीची निवृत्ती

मतदारांनीच दिली शरद पवारांना सक्तीची निवृत्ती

मतदारांनी या निर्णायक कौल दैऊन पवारांच्या जिहादी राजकारणाचा कडेलोट केला.

Google News Follow

Related

विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर शरद पवार आणि रिकी पॉण्टींग यांचा तो जुना गाजलेला व्हीडीयो आठवला. ऑस्ट्रेलिय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. पवारांनी कर्णधार रिकी पॉण्टींगच्या हाती ट्रॉफी दिली. सर्व खेळाडूंनी सेलिब्रेशन सुरू केले. तरीही पवार स्टेजवरून हलत नव्हते. एका खेळाडूला त्यांना बाजूला करावे लागले. अजित पवार सांगून सांगून थकले की, थांबा, निवृत्त व्हा, तरुणांना संधी द्या. पवार काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. सरकार खाली खेचल्याशिवाय मी म्हातारा होत नाही, अशी डायलॉगबाजी सुरू होती. विधानसभा निवडणुकीचे जे निकाल येतायत, त्यातून स्पष्ट संकेत मिळाले आहेत की अजित पवारांनी बाजी मारली आहे. थोरल्या पवारांना मतदारांनी सक्तीची निवृत्ती दिलेली आहे.

२०१९ मध्ये शरद पवारांनी शिवसेना भाजपा युती फोडली. भाजपाला निर्विवादपणे दणका दिला. मविआची मोट बांधली. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केले. पवारांच्या यशस्वी डावपेचांचा हा कळस होता. इथून त्यांची घसरण सुरू झाली. महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर सुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी तत्कालिन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस होते. २०२२ मध्ये फडणवीसांना एकनाथ शिंदे यांना सोबत घेऊन उद्धव ठाकरेंना सत्तेवरून खाली खेचले. महायुतीची सत्ता आणली. शिवसेनेच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचीही शकले झाली. शरद पवारांचे राजकारण संपले असे वाटत असताना पवारांनी लोकसभा निवडणुकीत कमबॅक केले, मविआला मोठे यश मिळाले. महायुतीचा बाजार उठला हे खरे, परंतु ज्योत विझण्या आधी मोठी होते असा हा प्रकार असावा.

हे ही वाचा:

मुस्लिम धर्मगुरू नोमानीविरोधात तक्रार दाखल

मालेगाव वोट जिहाद घोटाळा आता १००० रुपये कोटींचा झाला!

मशिदीच्या सर्वेक्षणावरून यूपीच्या संभलमध्ये तणाव, दगडफेक, २ ठार, १० जणांना अटक!

विधानसभा निवडणुकीचा निकाल राज्याच्या प्रगतीसाठी हितकारी

विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला २० च्या आसपास जागा मिळतील आणि अजित पवार यांच्या पक्षाला ४० जागा मिळतील असे चित्र दिसते आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालात मविआची सरशी झाल्यानंतर अजित पवार यांनी आपले सगळे शिलेदार सांभाळून ठेवले. एकही बडा नेता शरद पवारांसोबत गेला नाही. परंतु चर्चा अशी होती की, विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार यांच्या पक्षाचे लोक शरद पवारांकडे जातील. हे सगळे समीकरण बदललेले आहे. विधानसभा निवडणुकीत मविआला यश मिळेल अशी अटकळ बांधण्यात येत होती. परंतु अजितदादांना यश मिळेल असे कोणीही ठामपणे सांगत नव्हता. विधानसभा निवडणुकीनंतर ते एकटे राहतील अशीही चर्चा होती. झाले भलतेच. शरद पवारांच्या पक्षाचा सुपडा साफ झाला. कायम ५०-५५ च्या आसपास राहणारे ठाकरे २० वर आटोपले. महाराष्ट्राला महीला मुख्यमंत्री देण्याचे त्यांचे स्वप्न भंगले.

 

हा खरे तर शरद पवारांच्या जातवादी राजकारणाचा, त्यांच्या मुस्लिम लांगुलचालनाचा पराभव आहे. त्यांनी मनोज जरांगे नावाचे प्यादे उभे करून देवेंद्र फडणवीसांना राजकीय मात देण्याचा प्रयत्न केला. सज्जाद नोमानीला उभे करून एकगठ्ठा मतांची तजवीज केली होती. मुस्लीम मतांवर त्यांचा प्रचंड विश्वास होता. याच मतांमुळे आम्ही सत्तेवर येतो हा त्यांचा विश्वास होता. २०१९ मध्ये त्यांनी हा विश्वास बोलून सुद्धा दाखवला होता. मुस्लीम मतांमुळे आम्ही सत्तेवर आलो हे जाहीरपणे सांगितले होते. त्याच ओझ्या खाली ते सतत वावरत होते. औरंगाबादचे नामांतर झाल्यानंतरही मी छत्रपती संभाजी नगर म्हणणार नाही, हा हेका त्यांना कायम ठेवला. त्यांचे शिलेदार अफजलखान आणि औरंगजेबाची भलामण करत राहीले. महाराष्ट्रात मराठ्यांना मुस्लिमांच्या दावणीला बांधून सत्तेच्या चाव्या स्वत:कडे राहतील अशा सोंगट्या फेकण्याचा
त्यांनी सतत प्रयत्न केला. हे राजकारण महाराष्ट्राच्या हिताचे नव्हते. या राजकारणामुळे महाराष्ट्राच्या समाजकारणाचा पोत बदलला. जाती जातीत द्वेष निर्माण झाला. जिहादी राजकारणाला ऊत आला.

मतदारांनी या निर्णायक कौल दैऊन पवारांच्या जिहादी राजकारणाचा कडेलोट केला. पवारांना राज्यसभेवर जाता येणार नाही याची तजवीज महाराष्ट्राच्या मतादारांनी करून ठेवली आहे. राजकीय दृष्ट्या पवारांना घरी बसवले आहे. त्यांना सक्तीची विश्रांती दिलेली आहे. महाराष्ट्राला पहीली महीला मुख्यमंत्री देण्याचे त्यांचे स्वप्न भंगले आहे. महाराष्ट्राच्या जनतेने पवारांचे राजकारण संपवले आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
213,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा