उत्तर प्रदेशातील संभल येथील शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणावरून मुस्लिमांनी विरोध केल्याने आज परिसरात तणाव निर्माण झाला. शाही जामा मशिद हे हरिहर मंदिर असल्याचा दावा करण्यात आल्यानंतर मशिदीच्या सर्वेक्षणासाठी न्यायालयाने परवानगी दिली होती. न्यायालयाच्या आदेशानंतर मशिदीच्या सर्वेक्षणासाठी सर्वेक्षण पथक येताच शेकडोच्या संख्येने आंदोलक शाही जामा मशिदीजवळ जमले आणि त्यांनी या कारवाईला विरोध केला. प्रचंड पोलीस बंदोबस्त असलेल्या पाहणी पथकावर जमावाने दगडफेक केल्याने परिस्थितीला हिंसक वळण लागले. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. या प्रकरणी १० जणांना अटक करण्यात आली आहे.
जामा मशिदीच्या प्रमुखाने मशिदीच्या आतून घोषणा करत मशिदीभोवती जमलेल्या जमावाला पांगण्याचे आवाहन केले. मात्र, त्यांनी आंदोलन सुरूच ठेवले. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनीही जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचे प्रयत्न अयशस्वी ठरले आणि जमावाने दगडफेक सुरू केली.
“न्यायालयाच्या आदेशानुसार संभळमध्ये सर्वेक्षण करण्यात येत आहे. काही समाजकंटकांनी दगडफेक केली आहे. पोलिस आणि वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत. उत्तर प्रदेशचे सर्वोच्च पोलीस प्रशांत कुमार म्हणाले की, परिस्थिती नियंत्रणात आहे, दगडफेक करणाऱ्यांची ओळख पटवून योग्य ती कारवाई कायदेशीर कारवाई करण्यात येईल. मिळालेल्या माहितीनुसार, या हिंसाचारात आतापर्यंत २ जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, हिंदू बाजूचे वकील विष्णू शंकर जैन यांनी तेथे मंदिर अस्तित्वात असल्याचा दावा मांडला होता, त्यावर सुनावणी होऊन बुधवारी (१९नोव्हेंबर) न्यायालयाने आयुक्तांना संभलच्या शाही जामा मशिदीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. माहितीनुसार, हिंदू पक्षाने संभल जिल्ह्यातील प्राचीन जामा मशिदीवर भगवान विष्णूचे हरिहर मंदिर असल्याचा दावा केला आहे. या प्रकरणी न्यायालयाने वकिल आयुक्तांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले असून, त्यांना सर्वेक्षण करून अहवाल सादर करावा लागणार आहे.
हे ही वाचा :
विकास, उत्तम प्रशासनाचा आणि परिवारवादाला मूठमाती देणारा हा विजय
महाराष्ट्रात त्सुनामी; महायुतीने केला मविआचा सुपडा साफ, भाजपाचे ऐतिहासिक यश
विनोद तावडेंवर आरोप करणाऱ्या हिंतेंद्र ठाकूर, क्षितीज ठाकूरचा सुपडा साफ!
ठाकरे चक्क म्हणाले, राज्यातील जनतेने खचून जाऊ नये!