30 C
Mumbai
Thursday, September 24, 2026
घरदेश दुनियाविखे पाटील घराण्याची लेक स्वीडनच्या संसदेत

विखे पाटील घराण्याची लेक स्वीडनच्या संसदेत

नीला विखे पाटील यांना मोठे यश

Google News Follow

Related

- Advertisement -National Stock Exchange

महाराष्ट्रातील विखे पाटील घराण्याचा राजकीय आणि सामाजिक वारसा आता थेट स्वीडनच्या संसदेत पोहोचला आहे. शिक्षणतज्ज्ञ अशोक विखे पाटील यांच्या कन्या, माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांच्या नात आणि राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुतणी नीला विखे पाटील यांची स्वीडनच्या संसदेत खासदार म्हणून निवड झाली आहे. स्टॉकहोम सिटी मतदारसंघातून ग्रीन पार्टीच्या उमेदवार म्हणून त्या विजयी झाल्या. स्वीडनच्या ३४९ सदस्यीय संसदेत म्हणजेच ‘रिक्सदाग’मध्ये आता त्यांचा आवाज उमटणार आहे. या निवडीमुळे महाराष्ट्रातील एका परिचित राजकीय घराण्याचे नाव आंतरराष्ट्रीय राजकारणात पुन्हा चर्चेत आले आहे.

नीला यांचा जन्म स्वीडनमध्ये झाला असला, तरी त्यांचे महाराष्ट्राशी असलेले नाते कायम राहिले आहे. त्यांच्या बालपणातील काही काळ अहिल्यानगरमध्ये गेला. त्यानंतर स्वीडनमध्ये परतल्यानंतर त्यांनी शिक्षणासोबतच राजकारणात सक्रिय सहभाग घेतला. वयाच्या अवघ्या १६व्या वर्षी त्यांनी राजकीय क्षेत्रात प्रवेश केला. पुढे स्वीडनच्या राजकारणात विविध जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांनी पंतप्रधान कार्यालयात सल्लागार म्हणूनही काम केले. वित्त, करप्रणाली आणि गृहनिर्माण यांसारख्या विषयांवर काम करण्याचा त्यांना अनुभव आहे. त्यानंतर स्टॉकहोम सिटी कौन्सिलमध्ये काम करत त्यांनी स्थानिक पातळीवरही राजकीय अनुभव मिळवला. ग्रीन पार्टीशी जोडले गेल्यानंतर पर्यावरण आणि सामाजिक प्रश्नांवर त्यांनी आपली भूमिका मांडली.
हे ही वाचा:
एलपीजी सबसिडीसाठी आधार बायोमेट्रिक प्रमाणीकरण अनिवार्य

दोन हजारांपेक्षा जास्त रेल्वे तिकीट बुकिंगवर यूपीआयचा नवा नियम

झारखंडचा ३० लाखांचे इनाम असलेला नक्षली ब्रजेश गंझूचे वाराणसीत एन्काऊंटर

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची सुरुवात रौप्यपदकाने

नीला यांच्या कुटुंबाचा महाराष्ट्राच्या राजकारणासोबतच सहकार आणि शिक्षण क्षेत्रातही मोठा वारसा आहे. त्यांचे पणजोबा विठ्ठलराव विखे पाटील यांनी आशियातील पहिला सहकारी साखर कारखाना उभारला होता. माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांच्या कार्याचा वारसाही या कुटुंबाला लाभला आहे. आता याच कुटुंबातील नीला यांनी स्वीडनच्या संसदेत प्रवेश केला आहे. पर्यावरण, बालकल्याण आणि सामाजिक समावेशनाशी संबंधित मुद्द्यांवर काम करण्याचा त्यांचा मानस आहे. महाराष्ट्राच्या मातीत रुजलेल्या विखे पाटील कुटुंबातील एका नव्या पिढीने स्वीडनच्या राजकारणात मिळवलेले हे स्थान त्यामुळे विशेष चर्चेचा विषय ठरले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
334,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा