28.8 C
Mumbai
Thursday, June 25, 2026
घरदेश दुनियाव्हेनेझुएलाला शक्तिशाली भूकंपांचा दुहेरी तडाखा; अनेक इमारती कोसळल्या

व्हेनेझुएलाला शक्तिशाली भूकंपांचा दुहेरी तडाखा; अनेक इमारती कोसळल्या

त्सुनामीचा इशारा

Google News Follow

Related

दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएलामध्ये बुधवारी (२४ जून) शक्तिशाली भूकंपांच्या मालिकेने मोठी दहशत निर्माण केली. सुरुवातीला ७.१ रिश्टर तीव्रतेचा भूकंप नोंदवण्यात आला, त्यानंतर अवघ्या काही सेकंदांत आणखी एक अधिक तीव्र धक्का बसला. या भूकंपांमुळे राजधानी काराकाससह अनेक भागांमध्ये इमारतींचे मोठे नुकसान झाले असून काही ठिकाणी संरचना कोसळल्याच्या घटना समोर आल्या आहेत. भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा देण्यात आला होता.

अमेरिकेच्या भूगर्भीय सर्वेक्षण संस्थेच्या (USGS) माहितीनुसार, पहिला भूकंप व्हेनेझुएलाच्या कॅरिबियन किनारपट्टीलगत झाला. त्याचे केंद्रबिंदू मोरोन परिसराच्या पश्चिमेस सुमारे १० किलोमीटर खोलीवर होते. भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की राजधानी काराकासमधील उंच इमारती हलू लागल्या आणि नागरिकांनी घाबरून रस्त्यांवर धाव घेतली. यानंतर अवघ्या ४० सेकंदांच्या आत ७.२ आणि ७.५ रिश्टर तीव्रतेचे सलग धक्के बसल्याची माहिती विविध आंतरराष्ट्रीय माध्यमांनी दिली आहे. भूकंपतज्ज्ञांनी या घटनेला “डबल्ट” म्हणजेच एकाच परिसरात अल्पावधीत आलेले दोन अतिशय शक्तिशाली भूकंप असे संबोधले आहे.

काराकास आणि किनारी भागांमध्ये अनेक इमारतींना तडे गेले असून काही निवासी इमारती कोसळल्याचे वृत्त आहे. सामाजिक माध्यमांवर समोर आलेल्या व्हिडिओंमध्ये ढिगाऱ्यात रूपांतर झालेल्या इमारती, रस्त्यांवर पसरलेला मलबा आणि जीव वाचवण्यासाठी धावणारे नागरिक दिसत आहेत. काही भागांत वीज आणि दूरसंचार सेवाही विस्कळीत झाल्या आहेत. भूकंपानंतर अमेरिकेच्या पॅसिफिक त्सुनामी वॉर्निंग सेंटरने व्हेनेझुएलाच्या किनारपट्टीसह अरुबा, बोनेअर आणि कुरासाओ या बेटांसाठी त्सुनामीचा इशारा जारी केला. तसेच प्युर्टो रिको आणि यूएस व्हर्जिन आयलंड्ससाठी सल्ला जारी करण्यात आला. नंतर परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर काही भागांतील इशारे मागे घेण्यात आल्याची माहिती समोर आली.

भूकंपानंतर व्हेनेझुएलाच्या प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणा तातडीने सक्रिय केल्या आहेत. बचाव पथके प्रभावित भागांत पाठवण्यात आली असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध सुरू आहे. काही अहवालांनुसार सरकारने आपत्कालीन स्थिती जाहीर करून आरोग्य व बचाव यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.

हे ही वाचा:

वैभव सूर्यवंशीसाठी ICCचा खास नियम

जमीन बळकावल्या प्रकरणी माजी तृणमूल आमदारासह मुलीला नोटीस

तरुणीच्या होणाऱ्या पतीला खासगी फोटो पाठवले, तिघांचा गेला जीव

“राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीला शुभेंदू अधिकारींनी खूप मदत केली”

शतकातील सर्वात मोठ्या भूकंपांपैकी एक

काही आंतरराष्ट्रीय अहवालांनुसार हा भूकंप व्हेनेझुएलामध्ये गेल्या शतकाहून अधिक काळातील सर्वात शक्तिशाली भूकंपांपैकी एक मानला जात आहे. USGS नेही मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान आणि जीवितहानी होण्याची शक्यता वर्तवली आहे. मात्र ही बातमी लिहिपर्यंत मृत्यू किंवा जखमींची अधिकृत आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नव्हती. दरम्यान, आफ्टरशॉक्स म्हणजेच भूकंपानंतरचे धक्के बसण्याची शक्यता कायम असल्याने नागरिकांना उघड्या जागी राहण्याचे आणि अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
317,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा