29 C
Mumbai
Wednesday, May 18, 2022
घरदेश दुनियाश्रीलंकेत २६ मंत्र्यांनी दिला राजीनामा

श्रीलंकेत २६ मंत्र्यांनी दिला राजीनामा

Related

भारताचा शेजारील देश श्रीलंका हा सर्वात भीषण अशा आर्थिक संकटाचा सामना करत आहे. देशात हिंसाचार उसळला आहे. दरम्यान श्रीलंकेतील सर्व कॅबिनेट मंत्र्यांनी रविवार, ३ एप्रिल रोजी रात्री तत्काळ आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. सामूहिक राजीनामा देण्याचे कोणतेही कारण सांगण्यात आलेले नाही.

कॅबिनेट मंत्र्यांनी श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबायो राजपक्षे यांच्याकडे राजीनामे सुपुर्द केल्याचे देशाचे शिक्षण मंत्री आणि सभागृह नेते दिनेश गुणवर्धने यांनी सांगितले. देशातील सध्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे मंत्र्यांवर असलेल्या प्रचंड दबावामुळे मंत्र्यांनी राजीनामा दिल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

परिस्थिती चिघळण्याची शक्यता असल्यामुळे राष्ट्रपती राजपक्षे यांनी शुक्रवारी रात्री उशिरा श्रीलंकेत तत्काळ आणीबाणी लागू करण्याची घोषणा केली. त्यापूर्वी कर्फ्यूही लागू करण्यात आला होता. मात्र, कर्फ्यू लागू असूनही नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्यात आली. आंदोलक राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत.

राष्ट्रपती सरकारने शनिवार संध्याकाळी सहा वाजेपासून सोमवारी सकाळी सहा वाजेपर्यंत ३६ तासांचा कर्फ्यूही लागू केला. कर्फ्यू काळात श्रीलंका सरकारने व्हॉट्सअप, ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया ऍपवरही बंदी घातली होती. मात्र ही बंदी रविवारी उठवण्यात आली.

हे ही वाचा:

नववर्षाचा पहिला दिवस ठरला शेवटचा! चाकूचे वार करत पुजाऱ्याचा खून

चेतक: राष्ट्रसेवेची ६० गौरवशाली वर्षे

गतविजेत्या इंग्लंडला धूळ चारत ऑस्ट्रलियन महिलांनी सातव्यांदा उचलला विश्वचषक

पवन एक्सप्रेसचे चार डबे रुळावरून घसरले, एक ठार

देशामध्ये मागील काही महिन्यांपासून खाद्यपदार्थांबरोबरच जीवनावश्यक वस्तूंचे दर, गॅसचा आणि इंधन तुटवडा अशा समस्यांना नागरिक तोंड देत आहेत. वीज वाचवण्यासाठी सरकारने पथदिवे बंद केले होते. काही दिवसांपूर्वी औषधांच्या कमतरतेचं कारण देत शस्त्रक्रीया थांबवल्या होत्या. या परिस्थितीनंतर श्रीलंकेत आंदोलनं होऊ लागली आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,978चाहतेआवड दर्शवा
1,883अनुयायीअनुकरण करा
9,330सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा