29 C
Mumbai
Sunday, January 4, 2026
घरक्राईमनामाबांगलादेशमध्ये जुलैपासून आवामी लीगच्या ४०० नेते, कार्यकर्त्यांचा मृत्यू!

बांगलादेशमध्ये जुलैपासून आवामी लीगच्या ४०० नेते, कार्यकर्त्यांचा मृत्यू!

बहुतांश हिंसक घटनांमध्ये अवामी लीगचे सदस्य ठरले बळी

Google News Follow

Related

भारताचा शेजारी देश असलेल्या बांगलादेशमध्ये यावर्षी सत्तापालट झाला. आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण मिळत गेले आणि संतप्त आंदोलकांनी शेख हसीना यांना सत्तेवरून हटवले. शेख हसीना यांनी भारतात आश्रय घेतला तर त्यांचा राजकीय पक्ष असलेल्या अवामी लीगच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना आंदोलकांचा आणि कट्टरवाद्यांचा रोष सहन करावा लागला.

आवामी लीग हा बांगलादेशातील सर्वात जुना पक्ष असून या पक्षाने असा दावा केला आहे की, या वर्षी जुलैपासून इस्लामिक संघटना आणि जमात-ए-इस्लामी कार्यकर्त्यांनी त्यांचे सुमारे ४०० नेते आणि कार्यकर्ते ठार केले आहेत. माहितीनुसार, बहुतांश हिंसक घटनांमध्ये अवामी लीगचे सदस्य बळी ठरले आहेत. जमात-ए-इस्लामीने संपूर्ण बांगलादेशात विरोधकांवर हल्ला करण्यासाठी अवलंबलेली ही ट्रेडमार्क शैली आहे. जमात-ए-इस्लामीची विद्यार्थी संघटना असलेली छात्र शिबीर अशा हत्यांसाठी ओळखली जाते.

अवामी लीगने अलीकडेच जुलैपासून मारल्या गेलेल्या त्यांच्या ३९४ अधिकाऱ्यांची यादी जाहीर केली. या प्रकरणाशी संबंधित लोकांच्या म्हणण्यानुसार, पक्षाने सांगितले की ही एक प्राथमिक यादी आहे आणि येत्या काही दिवसांत आणखी हत्यांची माहिती जाहीर केली जाईल. ऑगस्ट महिन्यात शेख हसीना यांचे अवामी लीग सरकार पडल्यानंतर त्यांच्या पक्षाचे नेते, कार्यकर्ते आणि त्यांच्या कुटुंबियांना संपूर्ण बांगलादेशात पद्धतशीरपणे लक्ष्य केले जात आहे. अनेक प्रकरणांमध्ये, बांगलादेशातील सत्तापालटाच्या वेळी कार्यकर्त्यांची मालमत्ताही पाडण्यात आली, नुकसान करण्यात आले.

सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान संपूर्ण बांगलादेशात जमावाने मारहाण आणि मॉब लिंचिंग सामान्य होते. दोषींना लगाम घालण्यासाठी कोणतीही कारवाई सुरू करण्यात आलेली नव्हती. अवामी विद्यार्थी संघटना छात्रलीगला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यात आले असून त्यांच्या अनेक सदस्यांना तुरुंगात पाठवण्यात आले आहे. अवामी लीगला लक्ष्य करून हत्यांची मालिका सुरूच आहे. शेख हसीना यांनी ५ ऑगस्ट रोजी आपल्या बहिणीसोबत बांगलादेश सोडला. एका दिवसानंतर, पक्षाचे २९ सदस्य आणि त्यांचे कुटुंबीय मारले गेले.

हे ही वाचा:

‘वन नेशन, वन इलेक्शन’ विधेयकाच्या बाजूने २६९ तर विरोधात १९८ मते!

उद्धव ठाकरे भेटले फडणवीसांना; अभिनंदनासाठी की विरोधी पक्षनेतेपदासाठी?

रणजितसिंह मोहिते पाटलांवर होणार कारवाई?, भाजपाने शिस्तभंगाची पाठीविली नोटीस

आधी विरोध आता उद्धव ठाकरे लाडकी बहीण योजनेसाठी आग्रही!

बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायाधिकरणाने मंगळवारी माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्यावरील मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांचा तपास पूर्ण करण्यासाठी दोन महिन्यांची मुदत वाढवली. न्यायाधिकरणाचे अध्यक्ष न्यायमूर्ती गुलाम मुर्तुझा मजुमदार यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय खंडपीठाने हा आदेश दिला आणि जुलै- ऑगस्टमध्ये विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निदर्शनांदरम्यान हसीना आणि इतर ४५ जणांवर नरसंहाराचा गुन्हा दाखल केला त्याच्याविरुद्ध दाखल गुन्ह्यातील तपास पूर्ण करण्यास १८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
286,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा