28 C
Mumbai
Monday, December 5, 2022
घरदेश दुनियामालदीवमध्ये लागलेल्या आगीत ९ भारतीयांचा मृत्यू

मालदीवमध्ये लागलेल्या आगीत ९ भारतीयांचा मृत्यू

मालदीवमध्ये लागलेल्या आगीत भारतीय नागरिकांचा मृत्यू

Google News Follow

Related

मालदीवची राजधानी माले शहरात गुरुवारी परदेशी कामगार राहत असलेल्या घरांना आग लागली. आग इतकी भीषण होती काही क्षणात सर्वकाही बेचिराख झाले. या आगीत ९ भारतीयांनी आपला जीव गमावला आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत. बुधवारी रात्री उशीरा लागलेल्या आगीवर गुरुवारी सकाळी नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले. रात्री साडेबाराच्या सुमारास आग लागल्याची माहिती मिळताच तात्काळ पोलिस आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. इमारतीच्या तळमजल्यावरील गॅरेजमध्ये ही आग लागली होती. ती इतकी भीषण होती की काही क्षणातच होत्याचे नव्हते झाले होते.

वास्तव्यास परदेशी कामगार
इमारतीच्या पहिल्या मजल्यावर परदेशी कामगार वास्तव्यास होते. हे कामगार भारत, बांगलादेश आणि श्रीलंकेचे रहिवाशी होते. या अपघातात भारतासह बांग्लादेशी नागरिकाचाही मृत्यू झाला आहे. या इमारतीला दोन महिन्यांपूर्वी आग लागण्याची घटना याआधीही घडली होती. ही आग लागण्याची तिसरी वेळ होती.

गॅरेजमध्ये अनेक प्रकारचे गॅस
आगीचे नेमके कारण अजूनही समजू शकलेले नाही. या गॅरेजमध्ये अनेक प्रकारचे गॅस ठेवले होते, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. पोलिस त्याचा तपास करत आहेत. तपासानंतरच आगीचे खरे कारण समजेल.

हे ही वाचा:

अफझलखानाच्या मृत्यूदिनीच त्याच्या कबरीभोवतालच्या अनधिकृत बांधकामावर हातोडा

अडवाणी, जोशी आणि उमा भारती यांच्या निर्दोष मुक्ततेविरोधातील याचिका फेटाळली

आयटम गर्ल राखी सावंत सह दोघीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सऐपमध्येही आता नोकर कपात

मृतांच्या संख्या वाढू शकते
आग अतिशय वेगाने पसरल्याने लोकांना पळून जाण्याची संधीच मिळाली नाही. इमारतीच्या प्रमुख दरवाज्यालाच आग लागल्याने इमारतीतून बाहेर पडणे कठिण झाले होते. त्यामुळे छोट्या खिडकीतून लोकांना बाहेर काढण्यात आले. याच कारणामुळे बचावकार्याला वेग मिळू शकला नाही. त्यामुळे मृतांचा आकडा वाढला.

भारतीय उच्चायुक्तायाकडून शोक व्यक्त
माले येथे लागलेल्या आगीच्या घटनेमुळे आम्ही अत्यंत दुःखी आहोत. ज्यामध्ये भारतीय नागरिकांसह अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आम्ही मालदीवच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत, असे त्यांनी ट्वीट केले.
पहिल्या मजल्यावरून ७ लोकांचे मृतदेह सापडले. २ जखमी होते त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्यातील एक जण वाटेत तर दुसऱ्या जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर अग्निशमन दलाला आणखी दोन मृतदेह सापडले. आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाल्याचे स्थानिक प्रशासनाने सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,946चाहतेआवड दर्शवा
1,977अनुयायीअनुकरण करा
53,100सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा