28 C
Mumbai
Thursday, December 1, 2022
घरराजकारणक्रिकेटपटू रवींद्र जडेजाच्या बायकोला मिळाले गुजरातमध्ये भाजपाचे तिकीट

क्रिकेटपटू रवींद्र जडेजाच्या बायकोला मिळाले गुजरातमध्ये भाजपाचे तिकीट

जामनगरमधून निवडणूक लढवणार

Google News Follow

Related

क्रिकेटच्या मैदानावर वर्चस्व गाजवणारा टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाच्या पत्नी रिवाबा जडेजा जामनगरमधून उत्तर विधानसभा मतदारसंघातून भाजपतर्फे निवडणूक लढवणार आहेत. रिवाबा जडेजाने राजकारणाच्या मैदानात पाऊल ठेवताच आता त्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

रिवाबा यांनी तीन वर्षांपूर्वी लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजपमध्ये प्रवेश केला होता. तेव्हापासून ते राजकारणात सक्रिय आहेत. तसेच भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली होती . तेव्हापासून, रिवाबा जडेजा कोण याबाद्दल उत्सुकता वाढली होती.

रवींद्र जडेजाने २०१६ मध्ये रिवाबाशी लग्न केले. रिवाबाचे मूळ गाव जुनागढ असले तरी तिचा जन्म राजकोटमध्ये झाला. त्यांच्या जन्मापासून त्यांचे कुटुंब राजकोटमध्ये स्थायिक झाले होते. त्यांचे वडील हरदेवसिंग सोलंकी हे मोठे व्यापारी आणि कंत्राटदार आहेत. तर, रिवाबाने मेकॅनिकल इंजिनीअरिंग केले आहे.रिवाबाने भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर रवींद्र जडेजाची बहीण नयना जडेजासोबतच्या भांडणामुळे ती प्रसिद्धीच्या झोतात आली होती. नयना जडेजाने काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांच्यात कटुता निर्माण झाल्याचे बोलले जात होते. रिवाबा जडेजा ही काँग्रेस नेते हरिसिंह सोलंकी यांची भाची आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने १६० उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. घाटलोडिया विधानसभा मतदारसंघातून भाजपने मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना उमेदवारी दिली आहे. त्याचवेळी कांतीलाल अमृतिया यांना मोरबीमधून तिकीट देण्यात आले आहे. हार्दिक पटेल विरमगाममधून पहिल्यांदाच निवडणूक लढवणार आहे. भाजपच्या पहिल्या यादीत १४ महिलांना तिकीट मिळाले आहे. विद्यमान ६९आमदारांना तिकीट देण्यात आले आहे. ९९ पैकी ६९ जणांना तिकिटे मिळाली आहेत. विजय रुपाणी राजकोट पश्चिममधून निवडणूक लढवत होते, त्यांच्या जागी डॉ. दर्शिता शहा यांना तिकीट मिळाले आहे.

हे ही वाचा:

अफझलखानाच्या मृत्यूदिनीच त्याच्या कबरीभोवतालच्या अनधिकृत बांधकामावर हातोडा

अडवाणी, जोशी आणि उमा भारती यांच्या निर्दोष मुक्ततेविरोधातील याचिका फेटाळली

आयटम गर्ल राखी सावंत सह दोघीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सऐपमध्येही आता नोकर कपात

विधानसभेच्या १८२ जागा असलेल्या गुजरातमध्ये १ आणि ५ डिसेंबरला दोन टप्प्यात मतदान होणार आहे. ८ डिसेंबरला हिमाचल प्रदेशसह निकाल लागतील. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बुधवारी बैठक झाली. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा उपस्थित होते. या बैठकीत गुजरातमधील सर्व १८२ जागांसाठीच्या उमेदवारांच्या नावांवर चर्चा झाली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,950चाहतेआवड दर्शवा
1,976अनुयायीअनुकरण करा
52,600सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा