26 C
Mumbai
Sunday, December 10, 2023
घरविशेषआयटम गर्ल राखी सावंत सह दोघीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

आयटम गर्ल राखी सावंत सह दोघीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

राखील स्टंट पडला भारी

Google News Follow

Related

बॉलिवूड मधील एका अभिनेत्रीने ‘व्हिडीओ कॉन्फरन्स’मध्ये अश्लील चित्रफीत दाखवणे आयटम गर्ल राखी सावंत आणि फाल्गुनी ब्राम्हभट्ट या दोघीना चांगलेच भारी पडले आहे. या दोघीविरुद्ध या एका अभिनेत्रीने आंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून या दोघीविरुद्ध माहिती तंत्रज्ञान अधिनियम कायदा आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आयटम गर्ल राखी सावंत ही स्वतःच्या प्रसिद्धीसाठी काहीही करू शकते. तीने स्वतःला चर्चेत ठेवण्यासाठी बॉलिवूड मधील एका आघाडीच्या अभिनेत्रीला आपले लक्ष्य केले आहे. राखी सावंत आणि फाल्गुनी ब्रम्हाभट्ट या दोघीनी ३१ ऑक्टोबर, ३ आणि ५ नोव्हेंबर २०२२ रोजी व्हिडीओ कॉन्फरन्स घेऊन मीडियाला आमंत्रित करून या आघाडीच्या नायिकेने अश्लील चित्रफीत कॉन्फरन्समध्ये दाखवले होते. दोघींच्या या कृत्यानंतर या अभिनेत्रीना समाजात नाहक बदनामीला सामोरे जावे लागत आहे.

हे ही वाचा:

खासदार संजय राऊत यांना जामीन

लाचार माजी मुख्यमंत्र्याच्या संतापाला विचारतो कोण?

न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी घेतली नव्या सरन्यायाधीश पदाची शपथ

‘खोक्या’बद्दल लवकरच सुप्रिया सुळेंना नोटीस देण्याची तयारी

दरम्यान पीडित अभिनेत्री हिने पश्चिम उपनगरातील आंबोली पोलीस ठाण्यात धाव घेवून राखी सावंत आणि फाल्गुनी ब्रम्हाभट्ट या दोघीविरुद्ध तक्रार दाखल करून पोलिसांकडे पुरावे सादर केले आहे. आंबोली पोलिसानी या पुराव्याच्या आधारावर राखी सावंत आणि फाल्गुनी ब्रम्हाभट्ट या दोघीविरुद्ध विनयभंग, धमकी देणे, बदनामी करणे तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती आंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बंडोपंत बनसोडे यांनी दिली. याप्रकरणी अधिक तपास सुरू असून राखी सावंत आणि फाल्गुनी ब्रम्हाभट्ट या दोघीना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावण्यात येणार असल्याची माहिती बनसोडे यांनी दिली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,844चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
112,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा