31 C
Mumbai
Friday, May 3, 2024
घरविशेषपाकिस्तान अंतिम फेरीत धडकला पण भारत पोहोचेल?

पाकिस्तान अंतिम फेरीत धडकला पण भारत पोहोचेल?

आता भारताच्या लढतीकडे नजरा

Google News Follow

Related

टी-२० वर्ल्डकपमधून बाहेर पडता पडता पाकिस्तानने अंतिम फेरीत धडक मारण्याचा पराक्रम केला. आता भारत त्यांच्यासमोर अंतिम फेरीत उभा असेल की इंग्लंड याचा निर्णयही होणार आहे. पण भारत आणि पाकिस्तान यांच्यात जर अंतिम सामना झाला तर मात्र जगभरात त्या सामन्यावर सगळ्यांच्या उड्या पडणार आहेत. इंग्लंडने मात्र भारताला अंतिम फेरीत पोहोचू देणार नाही, असा चंग बांधला आहे. आज म्हणजे १० नोव्हेंबरला भारत इंग्लंड लढत होते आहे. त्याकडे साऱ्यांच्या नजरा आहेत.

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना ४ बाद १५२ धावा केल्या. त्याला पाकिस्तानने ३ विकेट गमावून उत्तर दिले आणि सामना जिंकला. पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवान (५७), बाबर आझम (कर्णधार ५३) आणि मोहम्मद हारिस (३०) यांनी आपल्या संघाला विजय मिळवून दिला.

हे ही वाचा:

खासदार संजय राऊत यांना जामीन

सुप्रिया सुळे यांचा गजनी झालाय का?

फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सऐपमध्येही आता नोकर कपात

एटीएममध्ये १ लाख ४० हजार रोख रक्कमेची फसवणूक

 

त्याआधी पाकिस्तानने न्यूझीलंडला ४ बाद १५२ धावांवर रोखले. केवळ डॅरिल मिचेल (ना. ५३) आणि कर्णधार केन विल्यमसन (४६) यांनी आपल्या संघाला आधार दिला. त्यामुळे त्यांना कशीबशी दीडशेपर्यंत धावसंख्या जमा करता आली.

टी-२० वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची ही पाकिस्तानची तिसरी वेळ आहे. २००७मध्ये पहिल्या टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताने पाकिस्तानला नमवून हा पहिलावहिला टी-२० वर्ल्डकप जिंकला होता. त्यामुळे पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती होते का, याची प्रतीक्षा आता चाहत्यांना लागून राहिली आहे.

यानिमित्ताने त्या पहिल्या टी-२० वर्ल्डकप अंतिम लढतीच्या आठवणी ताज्या होऊ लागल्या आहेत. श्रीशांतने तो घेतलेला झेल आणि भारताने जिंकलेला वर्ल्डकप ही आठवण कुणीही विसरलेले नाही. त्यानंतर मुंबईत या विश्वविजेत्या संघाची भव्य मिरवणूक उघड्या बसमधून काढण्यात आली होती. त्याच्याही आठवणी ताज्या आहेत.

न्यूझीलंडचा संघ गेल्या वर्ल्डकपमधील उपविजेता संघ आहे. पण यावेळी त्यांना अंतिम फेरीत प्रवेश करण्याची संधी साधता आली नाही. पण आता भारताने इंग्लंडला नमविले तर मेलबर्नला अंतिम फेरीत भारत पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी आमनेसामने येतील अशी आशा आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा