30 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
घरविशेषविराटने केला ४ हजार धावांचा विक्रम

विराटने केला ४ हजार धावांचा विक्रम

भारताचा सर्वोत्तम फलंदाज म्हणजेच विराट कोहलीने गुरुवारी असलेल्या इंग्लंडविरुद्ध मॅच खेळताना ४००० धावांचा टप्पा पार केला.

Google News Follow

Related

भारताचा सर्वोत्तम फलंदाज म्हणजेच विराट कोहलीने गुरुवारी असलेल्या इंग्लंडविरुद्ध मॅच खेळताना ४००० धावांचा टप्पा पार केला. विराट कोहली टी२० खेळाच्या इतिहासात सर्वात लहान फॉरमॅटमध्ये अशी कामगिरी करणारा पहिला फलंदाज आहे.

विराट कोहलीने टी-२०वर्ल्डकपमधील इँग्लंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात ४ हजार धावांचा टप्पा ओलांडला. त्याने कव्हर्समधून लियाम लिव्हिंगस्टोनच्या विरुद्ध चौकार मारून ही ऐतिहासिक कामगिरी केली. आज घडण्याऱ्या मॅचमद्धे भारत आणि इंग्लंड हे दोन संघ होते. कोहलीचे आर्ध शतक पूर्ण होताच त्यांची विकेट ख्रिस जॉर्डन याने घेतली. भारताने १६८/६ पर्यंत मजल मारली, हार्दिक पंड्याने ३३ चेंडूत ६३ धावा केल्या, ज्यात ५ षटकार आणि ४ चौकारांचा समावेश होता.

कोहलीकडे आता ११५ टी२० सामन्यांमध्ये १०७ डावांमध्ये ५२.७४च्या सरासरीने आणि १३७.९७ च्या स्ट्राइक रेटने ४००८ धावा आहेत. ह्या उत्कृष्ट भारतीय फलंदाजाने टी२० मध्ये एक शतक आणि ३७ अर्धशतके केली आहेत. टी२० मध्ये सर्वात जास्त धाव काढण्याऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहली ह्यांचे पहिले स्थान आहे. ह्या यादीत भारताचे कर्णधार रोहित शर्मा, न्यूझीलंडचे मार्टिन गप्टिल, पाकिस्तानचे बाबर आझम व आयर्लंड चे पॉल स्टीरलींग असे प्रसिद्ध खेळाडू आहेत.

हे ही वाचा:

अफझलखानाच्या मृत्यूदिनीच त्याच्या कबरीभोवतालच्या अनधिकृत बांधकामावर हातोडा

अडवाणी, जोशी आणि उमा भारती यांच्या निर्दोष मुक्ततेविरोधातील याचिका फेटाळली

आयटम गर्ल राखी सावंत सह दोघीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सऐपमध्येही आता नोकर कपात

या टी-२०विश्वचषक स्पर्धेतील ९८.६७ च्या जबरदस्त सरासरीने आणि १३६.४१ च्या स्ट्राइक रेटने सहा सामन्यांत २९६ धावांसह विराटआघाडीवर आहे. गुरुवारी आपल्या खेळीदरम्यान, टी-२० वर्ल्डकपमध्ये विराटने आणखी एक पराक्रम या सामन्यात केला तो म्हणजे आपल्या चौकारांचे शतक त्याने पूर्ण केले

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा