A Pakistani Cargo Plane Lost Radar Contact Near Karachi
29.1 C
Mumbai
Thursday, July 9, 2026
घरदेश दुनियापाकिस्तानी मालवाहू विमानाचा कराचीजवळ रडारशी संपर्क तुटला

पाकिस्तानी मालवाहू विमानाचा कराचीजवळ रडारशी संपर्क तुटला

पाच कर्मचाऱ्यांसह बेपत्ता विमानाचा शोध सुरू

Google News Follow

Related

पाकिस्तानातील खासगी कार्गो एअरलाइन के2 एअरवेज (K2 Airways) चे एक बोईंग ७३७-४०० मालवाहू विमान अरबी समुद्रावर बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. संयुक्त अरब अमिरातीतील शारजाह येथून कराचीकडे येत असताना विमानाने नेव्हिगेशन प्रणालीमध्ये बिघाड झाल्याची माहिती हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला (ATC) दिली होती. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांत विमानाचा रडार आणि रेडिओ संपर्क तुटला. विमानात पाच कर्मचाऱ्यांचा समावेश होता असून त्यांचा शोध घेण्यासाठी मोठे बचाव अभियान सुरू करण्यात आले आहे.

पाकिस्तान विमानतळ प्राधिकरणाच्या माहितीनुसार, KTA1732 या क्रमांकाचे कार्गो विमान मंगळवारी रात्री कराचीकडे येत असताना विमानाने रात्री ९.१८ वाजता (स्थानिक वेळेनुसार) नेव्हिगेशन प्रणालीमध्ये बिघाड झाल्याची माहिती कराची एअर ट्रॅफिक कंट्रोलला दिली. नियंत्रण कक्षाने वैमानिकांना आवश्यक मार्गदर्शन केले. मात्र, केवळ तीन मिनिटांनंतर म्हणजे ९.२१ वाजता विमानाने अचानक दिशा बदलली, वेगाने खाली येण्यास सुरुवात केली आणि कराचीच्या नैऋत्येस सुमारे १५५ नॉटिकल मैलांवर रडार आणि रेडिओ संपर्क पूर्णपणे तुटला.

फ्लाइट ट्रॅकिंग डेटानुसार, विमान अचानक हजारो फूट खाली आले, त्यानंतर काही क्षण पुन्हा उंची घेतली आणि लगेचच पुन्हा वेगाने खाली कोसळल्याचे दिसून आले. त्यानंतर विमानाचा कोणताही सिग्नल मिळालेला नाही. त्यामुळे विमान अरबी समुद्रात कोसळले असण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. मात्र, अधिकृतरीत्या अपघाताची पुष्टी अद्याप झालेली नाही.

हे विमान बोईंग ७३७-४०० मालवाहू विमान असून त्यामध्ये पाच क्रू सदस्य होते. प्रवासी कोणीही नव्हते. के2 एअरवेजने सांगितले की, वैमानिक, सहवैमानिक, लोड मास्टर आणि दोन अभियंते विमानात होते. कंपनीने सर्व संबंधित सरकारी यंत्रणांशी पूर्ण सहकार्य करत असल्याचे सांगितले असून कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करत असल्याचेही म्हटले आहे. विमान बेपत्ता झाल्यानंतर पाकिस्तान सरकारने तातडीने शोध आणि बचाव मोहीम सुरू केली आहे. पाकिस्तान नौदल, हवाई दल, राष्ट्रीय शिपिंग कॉर्पोरेशन तसेच व्यापारी जहाजांची मदत घेऊन अरबी समुद्रात शोधकार्य सुरू आहे.

हे ही वाचा:

मुंबईच्या पाणीसाठ्याला ‘मान्सून बूस्ट’; सात धरणांमध्ये ४१.३६ टक्के पाणीसाठा

शोपियान मध्ये ‘लष्कर’च्या टॉप कमांडरला घातल्या गोळ्या

बंगालमध्ये बलात्कार-हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पोलीस चकमकीत ठार

“केवळ मुंबई महानगरपालिकेला दोष देता येणार नाही, नागरिकही जबाबदार”

बेपत्ता झालेले विमान २७ वर्षे जुने बोईंग ७३७-४०० फ्रेटर असल्याची माहिती समोर आली आहे. हे विमान शारजाहहून कराचीकडे नियोजित मालवाहतूक उड्डाण करत होते. प्राथमिक माहितीनुसार, उड्डाणादरम्यान नेव्हिगेशन प्रणालीमध्ये अडथळा निर्माण झाला होता. विमानाच्या बेपत्ता होण्याचे नेमके कारण शोधण्यासाठी विमान वाहतूक तज्ज्ञ आणि तपास यंत्रणा सर्व तांत्रिक माहितीची छाननी करत आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
320,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा