31 C
Mumbai
Monday, December 8, 2025
घरदेश दुनियानोकरीसाठी रशियाला गेलेल्या तरुणाच्या हातात शस्त्र; युक्रेनविरुद्ध लढण्यास भाग पाडले!

नोकरीसाठी रशियाला गेलेल्या तरुणाच्या हातात शस्त्र; युक्रेनविरुद्ध लढण्यास भाग पाडले!

सरकारकडे मदतीची विनंती

Google News Follow

Related

हैदराबादच्या खैरताबाद येथील ३७ वर्षीय मोहम्मद अहमद याला नोकरीच्या आमिषाने फसवून रशियाला पाठवल्याचा आणि तिथे त्याला युक्रेनविरुद्धच्या युद्धात लढण्यासाठी भाग पाडल्याचा दावा त्याच्या कुटुंबाने केला आहे. अहमदची पत्नी फिरदौस बेगम यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना निवेदन दिले आहे आणि केंद्र सरकारकडून आपल्या पतीला मदत करून भारतात परत आणण्याची मागणी केली आहे. फिरदौस बेगम म्हणाल्या,  “त्याला शस्त्र देण्यात आले आहे आणि युक्रेनविरुद्धच्या युद्धात लढण्यासाठी सांगितले आहे. त्याचे शेवटचे ठिकाण यूक्रेन सीमेजवळ आहे. सरकारने त्याला मदत करुन परत आणावे.”

टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार, अहमद हा हैदराबादमध्ये बाउन्सर म्हणून काम करीत होता. मुंबईतील एका जॉब एजंटने त्याला रशियातील एका बांधकाम कंपनीत नोकरी देण्यात येईल असे सांगून २५ एप्रिल रोजी रशियाला पाठवले.
अहमदची पत्नी फिरदौस बेगम हिने सांगितले कि पती अहमदने कुटुंबाशी संपर्क साधून तेथील सर्व परिस्थिती सांगितली.
ती पुढे म्हणाली, अहमद भारत सोडल्यानंतर त्याला जवळजवळ एक महिना काम देण्यात आले नाही. “नंतर, माझ्या पतीसह इतर ३० जणांना एका दुर्गम भागात हलवण्यात आले आणि जबरदस्तीने शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देण्यात आले;

यात सहा जण भारतीय होते.

तीने पुढे सांगितले,  प्रशिक्षणानंतर, २६ जणांना युक्रेनियन सैन्याशी लढण्यासाठी सीमावर्ती भागात नेले गेले. सीमा जवळ नेले जात असताना अहमदने लष्कराच्या वाहनातून उडी मारून पळून जायचा प्रयत्न केला; पळताना त्याच्या उजव्या पायाला फ्रॅक्चर झाले.

हे ही वाचा : 

पंतप्रधान मोदींनी श्रीशैलम मंदिरात केली पूजा-अर्चना

ऑपरेशन सिंदूर आमच्या आत्मनिर्भरतेचा जिवंत पुरावा

किती टक्के भारतीय गाडी खरेदी करणार ?

एअर इंडियाच्या विमान AI171 अपघाताच्या न्यायालयीन चौकशीची मागणी

या दरम्यान अहमदने युद्ध लढण्यास नकार दिला; तथापि, कमांडमधील लोकांनी त्याला सांगितले की त्याला जाऊन लढावे लागेल. माझ्या पतीने मला सांगितले की त्याच्या गटातील जवळपास १७ जण युक्रेनियन सैन्याशी लढताना मरण पावले आहेत, असे फिरदौस बेगमने सांगितले.  दरम्यान, केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना दिलेल्या निवेदनात, फिरदौस बेगम यांनी त्यांच्या पतीला भारतात परत आणण्यासाठी मदतीची विनंती केली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा