29 C
Mumbai
Sunday, November 27, 2022
घरक्राईमनामालेखक सलमान रश्दी यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांच्या प्रकृतीबद्दल ही माहिती आली समोर

लेखक सलमान रश्दी यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांच्या प्रकृतीबद्दल ही माहिती आली समोर

बुकर पुरस्कार विजेते प्रसिद्ध लेखक सलमान रश्दी यांच्यावर एका कार्यक्रमात काही दिवसांपूर्वी जीवघेणा हल्ला करण्यात आला होता.

Google News Follow

Related

बुकर पुरस्कार विजेते प्रसिद्ध लेखक सलमान रश्दी यांच्यावर एका कार्यक्रमात काही दिवसांपूर्वी जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. अमेरिकेच्या न्यूयॉर्क येथील एका कार्यक्रमात रश्दी यांच्यावर हल्लेखोराने व्यासपीठावर जाऊन चाकूने हल्ला केला होता. या हल्ल्यात रश्दी गंभीर जखमी झाले होते. दरम्यान त्यांच्या प्रकृतीबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

रश्दी यांच्यावर हल्ल्यात सुमारे १५ वार करण्यात आले होते. त्यानंतर या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या रश्दी यांनी एका डोळ्याची दृष्टी गमावल्याची माहिती समोर आली आहे. तसेच त्यांचा एक हातही निकामी झाल्याचे वृत्त समोर आले आहे. याबाबतची माहिती रश्दी यांच्या एजंटने केला आहे.

रश्दींचे एजंट अँड्र्यू वायली यांनी स्पेनमधील ‘एल पेस’ या वृत्तपत्राला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी हा हल्ला किती गंभीर होता आणि यामुळे रश्दी याचं आयुष्य कसं बदललं, याची माहिती दिली. रश्दी यांच्या शरीरावर अनेक खोल जखमा होत्या. डोळ्यावर वार झाल्याने त्यांनी एका डोळ्याची दृष्टी गमावली आहे. तसेच त्यांच्या मानेवर तीन गंभीर आहेत. तसेच त्यांच्या हाताच्या नसा कापल्या गेल्याने त्यांचा एक हात निकामी झाल्याची माहितीही वायली यांनी दिली.

हे ही वाचा:

गांधी कुटुंबाला दणका, राजीव गांधी फाउंडेशनचे लायसन्स रद्द

उपग्रहांच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल पंतप्रधान इस्रोबद्दल काय म्हणाले?

शी जिनपिंग तिसऱ्यांदा चीनच्या राष्ट्राध्यक्षपदी

केनियात बेपत्ता असलेल्या दोन भारतीयांची हत्या

१२ ऑगस्ट रोजी न्यूयॉर्कमध्ये एका साहित्यिक कार्यक्रमात ७५ वर्षीय रश्दी यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. रश्दी यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत की त्यांना घरी सोडण्यात आले आहे याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं वायली यांनी सांगितलं आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,951चाहतेआवड दर्शवा
1,973अनुयायीअनुकरण करा
52,300सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा