23.9 C
Mumbai
Tuesday, January 20, 2026
घरदेश दुनियाअमेरिकेने केला इराणवर हल्ला; तीन आण्विक केंद्रांना केले लक्ष्य

अमेरिकेने केला इराणवर हल्ला; तीन आण्विक केंद्रांना केले लक्ष्य

युद्धाला सुरुवात झाल्याची चर्चा

Google News Follow

Related

अखेर अमेरिकेने इराणवर आक्रमण केले आहे. इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षात आता अमेरिकेनेही उडी घेतली असून इराणच्या तीन आण्विक केंद्रांवर अमेरिकेने बॉम्बहल्ला केला आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यानंतर देशाला उद्देशून अवघी तीन मिनिटे भाषण केले. ते म्हणाले की, अमेरिकन लढाऊ विमानांनी इराणमधील तीन अण्वस्त्र केंद्रांवर बॉम्बहल्ले केले. इराण आणि इस्रायलमधील सुरू असलेल्या युद्धात हा मोठा टप्पा ठरतो. ट्रम्प म्हणाले, लक्षात ठेवा, अजूनही अनेक लक्ष्य शिल्लक आहेत. आजचा हल्ला सर्वांत कठीण आणि कदाचित सर्वात घातक होता.”

“जर शांतता लवकर प्रस्थापित झाली नाही, तर आम्ही इतर लक्ष्यांवरही अचूकतेने, वेगाने आणि कौशल्याने कारवाई करू.

हल्ल्याचे प्रमुख लक्ष्य: फोर्डो प्रकल्प

फोर्डो हे एक युरेनियम संवर्धन केंद्र आहे जे डोंगराच्या आत खोलवर लपवण्यात आले आहे आणि इराणच्या अणुयोजनेसाठी महत्त्वाचे मानले जाते. पण तिथे अमेरिकेने मोठा हल्ला केला आहे. अजूनपर्यंत तिथे झालेल्या नुकसानीचे संपूर्ण तपशील समोर आलेले नाहीत.

इस्रायलच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की हे हल्ले अमेरिकेबरोबर पूर्ण समन्वयाने केले गेले.

हे ही वाचा:

‘२१ तारखेला मोठा योगा केला, मॅरेथॉन योगा’

केंद्र सरकारने सुरु केले नाविन्यपूर्ण ‘स्टार्टअप चॅलेंज’

मोदींच्या प्रयत्नाने योग मदरशांपर्यंत पोहोचला

तीर्थक्षेत्र, देवता, संत, अभंग व पवित्र वारी यांचा अवमान सहन करणार नाही !

इराणबरोबर गुप्त संपर्क

अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी CBS ला सांगितले की, अमेरिका इराणशी गुप्त राजनैतिक चॅनल्सद्वारे संपर्कात होती. यामध्ये स्पष्ट करण्यात आले की, ही हवाई कारवाई अंतिम आहे आणि “सत्ताबदलाचा प्रयत्न” करण्याचा अमेरिका कोणताही विचार करत नाही. इराणने यापूर्वीच इशारा दिला होता की कोणताही अमेरिकन हल्ला संपूर्ण प्रदेशात युद्ध भडकवू शकतो आणि ते त्याचे “चोख प्रत्युत्तर” दिले जाईल. आता इराण अमेरिकेच्या लष्करी तळांना लक्ष्य करू शकतो.

हे युद्ध कसे सुरू झाले?

१३ जून: इस्रायलने इराणवर अचानक हल्ला केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, हा हल्ला इराणच्या अणुकार्यक्रमाचा अंत करण्यासाठी होता. इराणने प्रत्युत्तरात शेकडो रॉकेट्स आणि ड्रोन इस्रायलवर डागले. दोन्ही देशांमध्ये गेल्या आठवड्यापासून सतत हवाई हल्ले सुरू आहेत.

ट्रम्प आणि अणुयुद्धावरील भूमिकेत बदल

ट्रम्प यांनी नेहमीच इराणला अण्वस्त्र मिळू नयेत अशी भूमिका घेतली आहे.

मार्चमध्ये अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर प्रमुख तूलसी गॅबार्ड यांनी म्हटले होते की इराणने युरेनियम साठा वाढवला आहे, पण अण्वस्त्र तयार करण्याचा हेतू दिसत नाही. ट्रम्प यांनी हे मत “चुकीचे” म्हटले.

.स्रायलच्या हल्ल्यापूर्वी अमेरिका-इराण अणुचर्चा सुरू होती.

ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वीच म्हटले होते की, इराणला दोन आठवड्यांचा वेळ चर्चेसाठी दिला जाईल, अन्यथा कारवाई होईल. पण ही मुदत पूर्ण होण्याआधीच हल्ला झाला.

तीन अणुस्थळांवर हल्ला: फोर्डो, नतांझ, आणि इस्फहान

फोर्डो: तेहरानच्या दक्षिणेला, डोंगरात खोलवर लपवलेले.

नतांझ: इराणचा आणखी एक महत्त्वाचा अणुस्थळ.

इस्फहान: अणु संशोधन व इंधन प्रक्रिया केंद्र.

GBU-57 MOP  अमेरिका वापरत असलेला ‘बंकर बस्टर’ बॉम्ब

नाव: GBU-57 Massive Ordnance Penetrator (MOP) . GBU-57 MOP  अमेरिका वापरत असलेला ‘बंकर बस्टर’ बॉम्ब. वजन: १३,००० किलोग्रॅम (३०,००० पाउंड) क्षमता: सुमारे १८ मीटर काँक्रीट किंवा ६१ मीटर माती भेदून स्फोट घडवू शकतो. फोर्डोचे बोगदे जमिनीच्या ८०-९० मीटर खोल असल्याने MOP हा एकमेव बॉम्ब आहे जो तेथे पोहोचू शकतो. अमेरिकेने प्रत्येक लक्ष्यावर दोन MOP बॉम्ब टाकले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
287,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा