११ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देशासह जगभरात योग दिन साजरा केला जात आहे. पंतप्रधान मोदींसह राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि नेत्यांनी आप आपल्या विभागात योगाभ्यास केला. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योगाभ्यास केला. यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी बंडाच्या दिवसाच्या आठवणींना उजाळा दिला. विशेष म्हणजे, आजच्या २१ तारखेलाच शिंदेंनी बंड केले होते आणि आज त्याला तीन वर्ष पूर्ण झाली. दरम्यान, उपमुख्यमंत्री शिंदेनी बंडखोरीवरून उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडले. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त त्यांनी सांगितले कि त्यांनी या दिवशी मोठा योग केला होता. तो मॅरेथॉन योग होता आणि त्यामुळे महाराष्ट्रात बरेच बदल झाले. त्यामुळे आज महाराष्ट्रात सर्वांगीण विकास होत आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
२१ जून २०२२ रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बंड केले आणि अनेक आमदारांसह सरकार स्थापनेचा दावा केला. शिंदे यांच्या दाव्याला भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवारांनी पाठिंबा दिला. त्यानंतर शिंदे मुख्यमंत्री झाले. त्याच वेळी पवारांना उपमुख्यमंत्रीपद मिळाले.
या बंडाची पत्रकारांनी आठवण करून देताच उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “२१ तारखेला आम्ही एक मोठा योगा केला, तो एक मॅरेथॉन योगा होता. तो योगा मुंबईपासून सुरू झाला आणि त्यामुळे २१ जून रोजी महाराष्ट्रात खूप बदल झाला आहे. येथे आपण विकास पाहत आहोत. आमचे सरकार लोकांसाठी काम करत आहे. पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी काम करत आहोत.”
हे ही वाचा :
पाकिस्तानला गुडघे टेकावे लागले, कोणताही हल्ला महागात पडेल!
डीजीसीएचा एअर इंडियावर कारवाई आदेश
कढीपत्ता : आरोग्याचा अमूल्य खजिना
अचूक हल्ल्यात कुद्स फोर्सचे दोन वरिष्ठ कमांडर ठार
दरम्यान, आजच्या योगा कार्यक्रमाची माहिती देताना उपमुख्यमंत्री शिंदे ट्वीटकरत म्हणाले, जागतिक योग दिनाच्या निमित्ताने टाईम्स ऑफ इंडिया, योगा इन्स्टिट्यूट, इंडियन कोस्ट गार्ड आणि शिवसेना प्रवक्त्या शायना एनसी यांच्या पुढाकाराने ‘योगा बाय द बे’ या उपक्रमाचे आयोजन केले होते. यंदा या उपक्रमाचे अकरावे वर्ष असून यानिमित्ताने या उपक्रमास उपस्थित राहून मुंबईकर नागरिकांशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या पुढाकाराने जागतिक योग दिन जगभर साजरा होऊ लागला. आज योगाचे महत्त्व पटल्याने एवढ्या मोठ्या प्रमाणात सर्वजण योग दिन साजरा करत आहेत.
अनेक रोगांना आपल्यापासून दूर ठेवण्याचे सामर्थ्य योगसाधनेत आहे. त्यामुळे आजच्या तरुणाईने इतर व्यसने करण्यापेक्षा योगाचे व्यसन धरायला हवे अशी अपेक्षा यावेळी बोलताना व्यक्त केली. तसेच या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, शिवसेना प्रवक्त्या शायना एनसी, इंडियन कोस्ट गार्डचे अधिकारी आणि ख्यातनाम फिटनेस ट्रेनर मिकी मेहता, योग शिक्षक आणि विद्यार्थी आवर्जून उपस्थित होते.
#WATCH | Mumbai | Maharashtra Deputy CM & Shive Sena chief Eknath Shinde says, "'21 taarikh ko hi humne bada Yoga kiya tha (splitting of Shiv Sena into two factions), wo marathon Yoga tha'. That Yoga began in Mumbai, and because of that, on June 21, Maharashtra has changed a lot;… pic.twitter.com/aFgyckEB6q
— ANI (@ANI) June 21, 2025
