27.5 C
Mumbai
Friday, July 11, 2025
घरविशेषतीर्थक्षेत्र, देवता, संत, अभंग व पवित्र वारी यांचा अवमान सहन करणार नाही...

तीर्थक्षेत्र, देवता, संत, अभंग व पवित्र वारी यांचा अवमान सहन करणार नाही !

समस्त वारकरी संप्रदाय व संघटनेचा इशारा 

Google News Follow

Related

महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जीवनात पंढरपूरच्या वारीला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज, संत नामदेव महाराज, संत सोपानकाका आणि अन्य थोर वारकरी संतांनी या वारीच्या माध्यमातून समाजाला जीवनाचे सार्थक करण्याचे ज्ञान दिले. सध्या मात्र काही अपप्रवृत्ती वारीच्या या पवित्र परंपरेत घुसखोरी करून संत साहित्य, अभंग, धर्मग्रंथ व वारकरी श्रद्धास्थानांविषयी अपप्रचार करत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरी नक्षलवादाच्या विरोधात कठोर भूमिका घेतली आहे. समरसता यांच्या नावाखाली काम करणारे तथाकथित, तसेच नक्षलवादी कारवायांमध्ये ज्यांचे कार्यकर्ते पकडले आहेत, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, कबीर कला मंच यांसह इतर पुरोगामी शिरले आहेत. त्यांच्यावर अर्बन नक्षलवादाचे गुन्हे नोंद आहेत. ही गोष्ट शासन-प्रशासनाने गांभीर्याने घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी.
यासाठी वारकरी संप्रदायाच्या वतीने या गैरप्रकारांवर युवा वारकरी लक्ष ठेवतीलच; परंतु अर्बन नक्षलवादाचा अजेंडा राबवणार्‍यांवर सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, असे आवाहन वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार संतवीर बंडातात्या कराडकर यांसह वारकरी संत, ह.भ.प. आणि मान्यवरांनी केले. समस्त वारकरी संप्रदाय, संस्थान, संघटना व हिंदु जनजागृती समिती वतीने आज (२१ जून) पुणे येथील श्रमिक पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
इंद्रायणी-चंद्रभागा या पवित्र नद्यांचे प्रदूषण, वारकर्‍यांच्या तीर्थक्षेत्री कायमस्वरूपी मद्य-मांस विक्री बंद करण्यात यावी. नक्षलवादाचा आरोप असणार्‍या संघटनांचे मुखवटे काढून त्यांचे खरे चेहरे उघड केले आहेत. रायगड जिल्ह्यामध्ये नक्षलवादाच्या आरोपाखाली अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे नोंद झाले आहेत. हे वारीच्या माध्यमातून अंनिस, कबीर कला मंच, पुरोगामी छुपा अजेंडा राबवत आहेत. अर्बन नक्षलवादाचा अजेंडा राबवणार्‍यांवर सरकारने कठोर कारवाई करावी, अशी मागणीही या वेळी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट यांनी यावेळी केली.
यावेळी महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे सचिव ह.भ.प. नरहरी महाराज चौधरी, श्रीक्षेत्र देहूचे माजी अध्यक्ष ह.भ.प. नितीन मोरे महाराज आणि ह.भ.प. वैभव महाराज मोरे, संत सोपानकाका पालखी सोहळा दिंडी समाज अध्यक्ष ह.भ.प. राम महाराज कदम, अखिल भारतीय संत समितीचे प्रदेश महामंत्री स्वामी भारतानंद सरस्वती महाराज, महाराष्ट्र वारकरी महामंडळाच्या कोकण प्रांताध्यक्ष ह.भ.प. भगवान महाराज कोकरे, राष्ट्रीय वारकरी परिषदेचे कार्याध्यक्ष ह.भ.प. बापू महाराज रावकर, श्री संत तुकाराम महाराज संस्थान, चिंतामणी प्रासादिक दिंडींचे ह.भ.प. दत्तात्रय चोरगे महाराज आणि अन्य संत-महंत उपस्थित होते.
वारकरी संप्रदायाची झुल पांघरून त्यांची बदनामी करणार्‍यांना वारीत प्रतिबंध घाला 

सध्या वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्रात सगळ्यात मोठा संप्रदाय आहे. वारकरी संप्रदाय कोणाचाही द्वेष, तिरस्कार, मत्सर करत नाही. वारकरी संप्रदाय कोणाच्याही टिका यांच्याकडे लक्ष देत नाहीत. असे असतांना काही लोक वाघाचे कातडे पांघरून वारकर्‍यांचे फसवण्याचे काम करतात. हे आम्ही कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही. अशा प्रकारे छुप्या प्रकाराने अयोग्य गोष्टी वारकरी संप्रदायावर जे थोपवण्याचे काम करतात. त्यांना वारकरी संप्रदायाने विरोध केला पाहिजे. आमच्या मागण्यांच्या संदर्भात आम्ही आषाढीपर्यंत वाट पाहू अन्यथा त्यानंतर आम्ही आमची भूमिका घोषित करू. मुख्यमंत्र्यांनी कत्तलखाना होऊ देणार नाही, असे आश्वासन दिले असले तरी, प्रशासनाने त्याचा लेखी आदेश तात्काळ करावा, तरच हा कत्तलखाना होणार नाही, हे आम्ही मान्य करू. वारकरी संप्रदायाची झुल पांघरून वारकरी संप्रदायाची बदनामी करणार्‍यांना वारीत प्रतिबंध घाला, असे संतवीर ह.भ.प. बंडातात्या कराडकर म्हणाले.

देहूप्रमाणे वारकर्‍यांच्या सर्व तीर्थक्षेत्री कायमस्वरूपी मद्य-मांस मुक्त करावीत
काही लोक संत, महाराज यांच्यावर टिका करत आहेत. यापुढील काळात साधू-संत महापुरुष यांच्यावर कुणी टिका करत असेल, तर शासनाने त्यांच्यावर त्वरित कारवाई केली पाहिजे. परदेशातून काही धार्मिक संस्था येऊन इकडे अयोग्य काम करतात. त्यांनाही रोखायला हवे. जिथे पालखी जाते तिथली मद्य मांस दुकाने बंद ठेवली जावीत,” अशी मागणी ह.भ.प. नितीन महाराज मोरे यांनी यावेळी केली.
हे ही वाचा : 
वारकरी संप्रदायाच्या विचारधारेविरोधी कार्य करणार्‍यांना जशास-तसे उत्तर देण्यास वारकरी सक्षम
ह.भ.प. नरहरि महाराज चौधरी म्हणाले, वारकरी संप्रदाय हा शांत संप्रदाय आहे. कुणी जर आमच्यासमवेत आनंद घेण्यासाठी येत असेल, तर आम्ही त्यांचे स्वागत करू; मात्र कुणी जर संप्रदायामध्ये येऊन, वारीमध्ये येऊन धर्मांतरासारखे प्रयत्न करत असेल, तर त्याला जशास-तसे उत्तर दिले जाईल. या गोष्टींना प्रशासनाने आळा घातला घालण्यासाठी प्रसासनाने प्रयत्न केला पाहिजे. तीर्थक्षेत्री ही आमच्या अनुष्ठांची स्थाने आहे. त्यामुळे ती मद्य-मांसमुक्त झाली पाहिजेत. यात्रा काळापुरती ही दुकाने बंद केली जातात. असे न होता तीर्थक्षेत्रांचे पावित्र्य जपण्यासाठी आणि समाज हितासाठी हे बंद झाले पाहिजे.
संत, महापुरुष यांवर टिका करणार्‍यांच्या विरोधी त्वरित कायदा करावा 
वारकरी संप्रदायाचे ग्रंथ आणि संत यावर शिंतोडे उडवण्याचे काम करतात. शासनाने या विरोधात कायदा करावा. या संदर्भात ७ पालखीप्रमुख आणि अन्य मोठ्या दिंडी प्रमुखांना एकत्रित करून पुन्हा बैठक घ्यावी. संत, महापुरुष यांवर टिका करणार्‍यांवर सरकारने ईशनिंदा विरोधी त्वरित कायदा करावा, अशी मागणी ह.भ.प. राम महाराज कदम यांनी केली.
…अन्यथा जनचळवळ उभी करू 
सरकारला इंद्रायणी, आळंदी याचे महत्त्व सांगावे लागते आणि पत्रकार परिषद घेऊन विरोध करण्याची वेळ यावी, हे दुर्दैव आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समिती, कबीर कला मंच जे देव मानत नाहीत, यांसारख्या संस्था वारकर्‍यांना फसवणूक करतात. प्रबोधन करण्याच्या नावाखाली गैरफायदा घेतात. हे सरकारने रोखावे, अन्यथा जन चळवळ उभी केली जाईल, असा इशारा स्वामी भारतानंद सरस्वती महाराज यांनी सरकारला दिला.
वारीत जातीयवादाचा पसरवणार्‍यांचा बुरखा फाडण्यासाठी प्रयत्नरत राहू
ह.भ.प. भगवान महाराज कोकरे म्हणाले, वारीमध्ये जातीयता, पसरवणे यांचा बुरखा फाडण्यासाठी आम्ही प्रयत्नरत राहू. ज्यांच्यावर नक्षलवाद गुन्हे आहेत, त्यांना पुढे करून दिशाभूल करण्याचे काम करतात. त्यामुळे प्रदूषण, धर्मांतरण, ईशनिंदा याविषयी सरकारने कठोर कायदा करावा.
National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
256,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा