27 C
Mumbai
Saturday, December 6, 2025
घरदेश दुनियाघर खरेदी करा जुन्या रेडीरेकनर दरानेच

घर खरेदी करा जुन्या रेडीरेकनर दरानेच

राज्य शासनाचा महत्वाचा निर्णय

Google News Follow

Related

घर खरेदी करण्याऱ्यांसाठी एक मोठी बातमी आली आहे. यावर्षी सुद्धा २०२२-२३ या वर्षाप्रमाणे यावर्षीच्या घर खरेदी करण्यासाठीचा रेडी रेकनर दर तोच ठेवून सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. राज्यातील रेडीरेकनरच्या दरांत यावर्षी कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे जुन्या रेडीरेकनरच्या दराने आता घर खरेदी करता येणार आहे. २०२२-२३ च्या दरांत कोणताच बदल न करता या २०२३-२४ वर्षी सुद्धा तोच दार लागू करण्यात यावा असे राज्यशासनाच्या आदेशात म्हंटले आहे. यामुळे मुंबईतील घर खरेदी विक्रीमुळे राज्याला १,१४३ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. मार्च २०२३ मध्ये मुंबई शहरामध्ये १२,४२१ युनिट्सची मालमत्ता विक्रीची नोंदणी झाली आहे. एकूण नोंदणीकृत मालमत्तांपैकी ८४ टक्के निवासी तर १६ टक्के अनिवासी मालमत्ता होत्या. मार्च २०२३ मध्ये मालमत्तेच्या नोंदणीमधून प्रत्येक दिवसाला ३७ कोटी रुपयांचे महसूल संकलनाची माहिती उपलब्ध आहे. मुंबईतील मार्च महिन्याच्या १२,४२१ मालमत्ता नोंदणी होण्याची हि वाढ जवळ जवळ २८ टक्के इतकी वाढलेली असून या आर्थिक वर्षातील ती वाढ सर्वोत्तम आहे. महाराष्ट्रात गेल्या वर्षी रेडीरेकनरच्या दरामध्ये सरासरी पाच टक्के वाढ करण्यात आली होती. हे ही वाचा: ‘सावरकर गौरव यात्रेला’ जळगावातून सुरुवात पंतप्रधानांनी पाहिले नवे संसदभवन… भव्य, सुसज्ज आणि नव्या रंगरूपात संभाजीनगर राड्यातील आरोपींचे सीसीटीव्ही फूटेज मिळाले रामनवमीचा सण देशभरात आनंदाने साजरा पालिकेच्या क्षेत्रामध्ये आठ पूर्णांक ८० टक्के आणि  ग्रामीण भागात सहा पूर्णांक ९६ टक्के तर नगरपालिका क्षेत्रांत तीन पूर्णांक ६२ टक्के वाढ करण्यात आली होती. सर्वात जास्त रेडी रेकनरच्या दरामध्ये  वाढ  नाशिक मध्ये  तर     मुंबई, पुणे आणि ठाण्यापेक्षा  कमी वाढ करण्यात आली आहे. कोरोनाच्या संकटामुळे आधीची दोन वर्षे रेडी रेकनरच्या दरात वाढ करण्यात आली नव्हती. यामध्ये राज्यात सगळ्यात जास्त १३.१२ टक्के वाढ हि मालेगाव मध्ये तर हिंगोली जिल्ह्यात सर्वात कमी वाढ करण्यात आली होती.  मुंबई महापालिका क्षेत्रात रेडी रेकनरच्या दरामध्ये दोन पूर्णांक ३४ टक्के एवढी वाढ झाली होती. काय आहे रेडी रेकनर ? जिल्हा, तालुका आणि गावाप्रमाणे रेडी रेकनरचे दर ठरवण्यात येतात  रेडीरेकनरप्रमाणे मालमत्तेचा बाजारभाव निश्चित करण्यात येतो. मुख्य नियंत्रक महसूल प्राधिकारी यांच्या मान्यतेनंतर  रेडीरेकनरचा दर निश्चित करण्यात येतो. रेडीरेकनरच्या दर हा बांधकाम व्यवसायिकांपासून, बँका, एजंट तसेच ग्राहकांसाठी उपयुक्त असतो.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा