दक्षिण कोरियात लवकरच आशिया-प्रशांत आर्थिक सहयोग (APEC) शिखर परिषद होणार आहे, ज्यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षही सहभागी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर दक्षिण कोरियातील बुसान शहरात बलुच नॅशनल मूव्हमेंट (BNM) या संघटनेने बलुचिस्तानच्या झेहरी भागात सुरू असलेल्या पाकिस्तानी सैन्याच्या घेराबंदी आणि आक्रमक कारवाईविरुद्ध आंदोलन केले. प्रदर्शनकर्त्यांनी बलुचिस्तानमधील मानवी स्थितीबद्दल माहिती देण्यासाठी आणि आपले दुःख मांडण्यासाठी स्थानिक कोरियन नागरिकांमध्ये इंग्रजी आणि कोरियन भाषेत पत्रके वाटली. बलुच नागरिकांचे म्हणणे आहे की पाकिस्तानी लष्कर लोकांना घरातून पळवून नेते आणि नंतर त्यांची हत्या करते.
BNM कार्यकर्त्यांनी पाकिस्तानी लष्करावर बलुच लोकांविरुद्ध युद्धगुन्हे केल्याचा आरोप केला आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्या लष्कराला जबाबदार धरण्याची मागणी केली. आंदोलनकर्त्यांनी ‘झेहरीतील घेराबंदी थांबवा!’, ‘बलुचिस्तानसाठी न्याय!’ आणि ‘बलुच नरसंहार बंद करा!’ असे घोषवाक्य असलेले फलक आणि बॅनर हातात धरले होते. याशिवाय त्यांनी दक्षिण कोरियातील लोकांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी झेहरी भागातील उद्ध्वस्त घरे आणि पीडित कुटुंबांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन केले.
हेही वाचा..
अंतर्गत रक्तस्त्रावामुळे श्रेयस अय्यर आयसीयुत दाखल, बीसीसीआयने काय म्हटले?
दात काढलेला नाग घेऊन भिक्षा मागणाऱ्यांना पकडले
झारखंड : ईसाई धर्म सोडून ८ जणांची ‘घरवापसी’
‘मोंथा’मुळे आंध्र प्रदेश, ओडिशाला रेड अलर्ट
BNMने सांगितले की, “पाकिस्तानी लष्कराने अलीकडेच केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये १० मुलांसह २० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला असून ५० पेक्षा जास्त तरुणांना जबरदस्तीने बेपत्ता करण्यात आले आहे.” त्यांनी झेहरीतील मानवी संकटाचे तपशीलवार वर्णन केले — अन्न, पाणी आणि औषधांची तीव्र टंचाई, रुग्णालयांना लष्करी ठिकाणांमध्ये रूपांतर आणि नागरिकांच्या हालचालींवर २४ तासांचा कर्फ्यू असल्याचे त्यांनी सांगितले.
BNMच्या एका कार्यकर्त्याने सांगितले, “झेहरी रक्ताने माखले आहे, आणि जगाला गप्प राहता कामा नये.” तसेच आंदोलनकर्त्यांनी एम्नेस्टी इंटरनॅशनलसह आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांना तातडीने हस्तक्षेप करण्याचे आणि झेहरीपर्यंत मानवी मदतीचा मार्ग खुला करण्याचे आवाहन केले. गेल्या आठवड्यात BNMने नेदरलँड्समधील यूट्रेक्ट शहरातही झेहरी भागातील पाकिस्तानी सैन्याच्या आक्रमणाचा निषेध करत आंदोलन केले होते. या निदर्शनात BNMचे सदस्य आणि मानवाधिकार कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यांनी बलुचिस्तानमधील पाकिस्तानी लष्कराचे आक्रमण, जबरदस्तीने बेपत्ता केलेल्या व्यक्ती आणि मानवी अधिकार उल्लंघनाविरोधात घोषणा असलेले फलक आणि बॅनर हातात धरले होते.
दक्षिण कोरियातील आंदोलनाशिवाय BNMने अमेरिकेतील व्हाइट हाऊससमोरही जनजागृती मोहिम राबवली. कार्यकर्त्यांनी झेहरीतील सुरू असलेल्या मानवी हक्कांच्या उल्लंघनांबद्दल आणि बिकट परिस्थितीबद्दल माहिती देणारी पत्रके वाटली. BNMने वाटलेल्या पत्रकांमध्ये पाकिस्तानला “दहशतवादी राष्ट्र” म्हटले असून, तो “बलुच आणि इतर पीडित राष्ट्रांच्या नैसर्गिक संपत्तीचा शोषण करणारा देश” असल्याचे नमूद केले आहे.







