29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
घरदेश दुनिया'वोक' बायडन यांना मोठा झटका

‘वोक’ बायडन यांना मोठा झटका

Google News Follow

Related

केवळ एक वर्षांपूर्वी निवडून आलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना २ नोव्हेंबर रोजी जोरदार धक्का बसला आहे. सलग १२ वर्ष सत्तेत असलेल्या आणि डेमोक्रॅटिक पक्षाचा गड मानल्या जाणाऱ्या व्हर्जिनिया या अमेरिकेतील एका राज्याची राज्यपाल पदाची निवडणूक रिपब्लिकन पक्षाने जिंकली आहे. बायडन यांच्यासाठी हा एक मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.

व्हर्जिनियामध्ये झालेल्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे यंगकीन यांनी विजय मिळवला आहे. डेमोक्रॅटिक पक्षच उमेदवार मेकॉलिफ यांचा त्यांनी पराभव केला. व्हर्जिनियामध्ये उपराज्यपाल आणि ऍटर्नी जनरलच्या निवडणुकांमध्येही रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार निवडून आले आहे आहेत. विशेष म्हणजे उपराज्यपाल पदाच्या उमेदवार विंसम सीअर्स या आफ्रिकन अमेरिकन वंशाच्या पहिल्या महिला उपराज्यपाल आहेत. शिवाय जेसन मायर्स हे हिस्पॅनिक (दक्षिण अमेरिकन) वंशाचे उमेदवार ऍटर्नी जनरलपदी निवडणूक जिंकून आले आहेत. यामुळे रिपब्लिकन पक्षावर केले जाणारे वंशवादाचे आरोप काही प्रमाणात बोथट होण्यास मदत होईल असं राजकीय विश्लेषक म्हणतात.

हे ही वाचा:

उत्तरप्रदेश, हरियाणानंतर मध्यप्रदेशात येणार ‘हा’ कायदा

आसाम सरकारचा ‘मास्टरस्ट्रोक’

चिमुरडीने का लिहिले सरन्यायाधीशांना पत्र?

चार धाम देवस्थान बोर्ड होणार बरखास्त?

याचबरोबर व्हर्जिनियामध्ये हाऊस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्ह म्हणजेच विधानसभेतही रिपब्लिकन पक्षाने बहुमत मिळवलं आहे. यामुळे अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच या राज्यात रिपब्लिकन पक्षाकडे विधानसभा अध्यक्ष पद, राज्यपाल पद, उपराज्यपाल पद आणि ऍटर्नी जनरल ही सर्व पदं असणार आहेत.

२०२० साली झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत जो बायडन यांनी तत्कालीन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा याच राज्यात १० टक्क्यांपेक्षा जास्त फरकाने पराभव केला होता. अशा राज्यामध्ये एका वर्षापेक्षाही कमी कालावधीत पराभव पत्करावा लागल्यामुळे बायडन सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. या पराभवामुळे बायडन सरकार त्यांच्या ‘वोक’ धोरणांचा त्याग करून माध्यममार्गी धोरणांचा अवलंब करणार का ‘वोक’ धोरणांवर अधिक भर देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा