29 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
घरदेश दुनियाबिल गेट्स का पडले मोदी आणि भारतीय लसीकरण मोहिमेच्या प्रेमात?

बिल गेट्स का पडले मोदी आणि भारतीय लसीकरण मोहिमेच्या प्रेमात?

Google News Follow

Related

भारतात १०० कोटी लशींचे डोस दिले गेल्यानंतर देशभरात मोदी सरकारचे कौतुक होत आहे. या कौतुक करणाऱ्यांत मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्सही आघाडीवर आहेत. टाइम्स ऑफ इंडियात लिहिलेल्या प्रदीर्घ लेखातून त्यांनी भारताला लसीकरणात मिळालेल्या या यशाचे विविध पैलू समोर आणले आहेत. बिल गेट्स म्हणतात की, भारताकडून मला आशा होत्या कारण प्रबळ नेतृत्व आणि आरोग्य व्यवस्थेतील सातत्यपूर्ण गुंतवणूक या माध्यमातून एखादा देश कसा यशस्वी होऊ शकतो, याचे उदाहरणच भारताने घालून दिले.

गेट्स या लेखात म्हणतात की, जिथे तब्बल १.४ अब्ज लोकसंख्या आहे अशा भारतात आरोग्यव्यवस्थेची जी काही आव्हाने आहेत ती पेलण्यात हा देश यशस्वी ठऱला आहे, त्यामुळे मी प्रभावित झालो आहे. लसीकरणाची भारतात राबविलेली ही मोहीम सर्वात भव्य आणि तेवढीच वेगवान होती. जवळपास ७५ टक्के प्रौढांना पहिला डोस मिळाला आहे तर ३१ टक्के लोकांना दोन्ही डोस मिळाले आहेत. त्यापैकी ४८ टक्के हे महिलांचे प्रमाण आहे. भारताचा आकार आणि लोकसंख्या विचारात घेता हे खूप मोठे काम भारताने करून दाखविले आहे. अर्थात, अजूनही हे लसीकरण पूर्ण झालेले नसले तरी भारताने जे यश मिळविले त्याची पंचसूत्री समजून घेणे गरजेचे आहे.

गेट्सने लिहिले आहे की, राजकीय इच्छाशक्ती हा सर्वात पहिला मुद्दा ज्यामुळे हे लसीकरण होऊ शकले. मोदी यांनी प्रत्येक पात्र भारतीय प्रौढ व्यक्तीला ३१ डिसेंबर २०२१पर्यंत लसीकरण पूर्ण करण्याचे भव्य उद्दीष्ट बाळगले. गेल्या वर्षी उच्चस्तरीय समित्या त्याकरिता स्थापन करण्यात आल्या.

दुसरा मुद्दा म्हणजे भारताने नेहमीच अनेक मोहिमांच्या माध्यमातून लोकांचे लसीकरण केलेले आहे. तो दीर्घकालीन अनुभव भारताच्या गाठीशी असल्याचा फायदाही भारताला झालेला आहे. त्यामुळेच कोरोना लसीकरणासाठी पायाभूत सुविधा उभारणे शक्य झाले. सार्वजनिक आरोग्याच्या बाबत भारताचा जो लसीकरण कार्यक्रम आहे तो जागतिक दर्जाचा आहे. प्रत्येक वर्षी प्राथमिक लसीकरणातून २ कोटी ७ लाख नवजात बालकांचे लसीकरण भारतात करण्यात येते. शिवाय, १ ते ५ वर्षांच्या १० कोटी मुलांना बूस्टर डोस देण्यात येतो. भारतात २७ हजार कोल्ड चेन सुविधा आहेत. यावरून हे लक्षात येते की, सातत्याने आरोग्यक्षेत्रात केलेल्या गुंतवणुकीचे हे परिणाम आहेत. कोरोनाच्या संकटकाळात ही सगळी व्यवस्था खूपच उपयुक्त ठरली. भारतात तब्बल ३ लाख ४८ हजार सार्वजनिक आरोग्य केंद्रे आहेत. २८ हजार खासगी केंद्रेही या कामात आघाडीवर होती. त्यामुळे ईशान्य भारत आणि पूरग्रस्त भागातही लसीकरण यशस्वीरित्या करता आले. भारतातील २३ लाख आशा व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना डॉक्टर, नर्सेस इतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसोबत कोरोना लसीकरणासाठी प्रशिक्षित करण्यात आले.

तिसरा पैलू म्हणजे भारताने लसीकरण तसेच औषध निर्मितीत स्वतःचे कौशल्य वृद्धिंगत केले. कोरोनाचे संकट येण्यापूर्वी भारतीय लसींनी मेंदूज्वर, न्युमोनिया, अतिसार यामुळे ग्रस्त असलेल्या अनेकांचे जीव वाचलेले आहेत. आम्हाला अभिमान वाटतो की, आमच्या फाऊंडेशनने (बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन) सिरम इन्स्टिट्यूट, भारत बायोटेक, बायोई या संस्थांशी तसेच भारत सरकारशी सहकार्य करत अनेक लसींचे उत्पादन करण्यात पुढाकार घेतला. आता कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लसी भारताला कोरोनापासून मुक्त करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

 

हे ही वाचा:

योगी सरकारने १५१ गुन्हेगारांना ठोकले

१०० कोटी लसीकरण हे नव्या भारताचे चित्र

धक्कादायक! पुण्यात भरदिवसा दरोडेखोरांनी लुटली बँक!

करी रोडमधील अविघ्न पार्क इमारतीला भीषण आग

 

चौथा मुद्दा म्हणजे भारताने आपल्या माहिती तंत्रज्ञानाचा केलेला उत्तम उपयोग. त्या माध्यमातून राष्ट्रीय लसीकरणावर लक्ष ठेवणारा कोविन सारखा मंच उपलब्ध करून देण्यात आला. अशा माध्यमाचा उपयोग इतर देशांनाही आरोग्यविषयक उपक्रमांना यशस्वीरित्या पूर्णत्वास नेण्यासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरू शकतो.

सर्वात महत्त्वाचा असा पाचवा मुद्दा म्हणजे भारतातील नागरिकांचा या लसीकरण मोहिमेतील सहभाग. भारतीयांनी ही लसीकरण मोहीम यशस्वी केली. पोलिओ निर्मूलन कार्यक्रमातून मिळालेल्या अनुभवामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी मिळून कोरोना लसीकरणाची मोहिम यशस्वी केली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा