20 C
Mumbai
Monday, January 24, 2022
घरअर्थजगतबीएमडब्ल्यूचा रंग माझा वेगवेगळा!

बीएमडब्ल्यूचा रंग माझा वेगवेगळा!

Related

कार खरेदी करताना सर्वात आधी आपण आपल्या आवडीच्या रंगाची कार पाहतो. परंतु, आता बीएमडब्ल्यूची कार घेताना असा रंग पाहण्याची गरज उरणार नाही का? कारण, रंग बदलणारी कारच या कंपनीने लाँच केली आहे. बीएमडब्ल्यूने जगातील पहिली रंग बदलणारी कार लाँच केली आहे.

जर्मन लक्झरी कार कंपनी बीएमडब्लूने अशी कार बनवली आहे, ज्याचा रंग क्षणार्धात बदलतो. अलीकडेच ही इलेक्ट्रिक कार वर्षातील सर्वात मोठ्या कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो (CES 2022) मध्ये प्रदर्शित करण्यात आली आहे.
बीएमडब्लू ने आपल्या सर्व आयएक्स इलेक्ट्रिक कारमध्ये रंग बदलण्याचा पर्याय दिला आहे.

जर्मन कार कंपनीने शोमध्ये सांगितले की, यामध्ये एक तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे, ज्यामध्ये एका बटणाच्या मदतीने कारच्या बाहेरील रंग बदलता येऊ शकतो. याशिवाय कंपनीने रंगाबाबत इतर कोणतीही माहिती दिलेली नाही. मात्र, ट्विटर युजर ‘ आउट ऑफ स्पेक स्टुडिओ ‘ ने या कारचा एक व्हिडिओ अपलोड केला आहे, ज्यामध्ये कारचा रंग बदलत आहे.

बीएमडब्ल्यू रिसर्च इंजिनिअर स्टेला क्लार्कने म्हटले की, ” ही टेक्नोलॉजी ई इंकचा वापर करून वास्तविक रंग बदलते. आम्ही ज्या मटेरियलचा वापर केला आहे. ही एक स्लीम पेपर प्रमाणे आहे. यात पांढऱ्या रंगाचा निगेटिव्ह चार्ज आणि काळ्या रंगाचा पॉझिटिव्ह चार्ज पिगमेंट आहे. फोन अँपद्वारे ज्यावेळी या पिकमेंट्सला सिग्नल पाठवले जाईल तेव्हा कार रंग बदलेल.

हे ही वाचा:

आम आदमी पक्षाचे मत फुटले! चंदीगड महापालिकेत मुख्य उपमहपौरही भाजपाचाच

कझाकस्तानातील ‘इंधन’ का पेटले?

कोविडच्या सावटामध्ये ‘या’ नव्या नियमांसह पार पडणार पाच राज्याच्या निवडणूका

चंदीगड महापालिकेत पुन्हा भाजपाचाच महापौर

 

व्हिडिओ क्लिपमध्ये बीएमडब्लू आयएक्स कार गडद राखाडी शेडमध्ये दिसत आहे. पण जेव्हा या कारजवळ उभ्या असलेल्या व्यक्तीने बटणाद्वारे त्याची सिस्टम बदलली, तेव्हा अचानक ही कार पांढर्‍या रंगात बदलते. रंग बदलण्याचे हे तंत्र दाखवणारी क्लिप थक्क करणारी आहे. हा व्हिडीओ पूर्णपणे फेक आहे असे दर्शकांना वाटत आहे आणि व्हिडिओ एडिटिंगच्या मदतीने या कारचा रंग बदलला जात आहे असे अनेकांना वाटत आहे. मात्र, हा व्हिडिओ खरा आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,588अनुयायीअनुकरण करा
5,780सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा