34 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
घरक्राईमनामाकाबूलमध्ये परराष्ट्र मंत्रालयाजवळ भीषण बॉम्बस्फोट, ५ ठार

काबूलमध्ये परराष्ट्र मंत्रालयाजवळ भीषण बॉम्बस्फोट, ५ ठार

 इस्लामिक स्टेटन दहशतवादी संघटनेने घेतली जबाबदारी

Google News Follow

Related

फगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये परराष्ट्र मंत्रालयाजवळ झालेल्या भीषण बॉम्ब स्फोटाची जबादारी स्फोटाची जबाबदारी इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. या स्फोटात किमान पाच जणांचा मृत्यू झाला आहे. २०२३मध्ये काबूलमध्ये झालेला हा दुसरा मोठा हल्ला आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने या हल्ल्याचा निषेध केला आहे.

दहशतवादी संघटनेने एका निवेदनात म्हटले आहे की त्यांच्या सदस्यांपैकी एक, खैबर अल-कंधारी याने मंत्रालयाचे कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचारी मंत्रालयाच्या मुख्य गेटमधून बाहेर पडत असताना त्याच्या स्फोटकांनी भरलेले जॅकेट स्फोट घडवून आणले.  दहशतवादी हल्ल्यात अनेक निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला. आतापर्यंत पाच जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. इस्लामिक स्टेट दाव्यानंतर अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

हे ही वाचा:

गोवा गुटख्याच्या मालकासह दाऊदच्या तीन साथीदारांना १० वर्षांचा कारावास

कट्टरतावादी विचारसरणीच्या कैद्यांना स्वतंत्र बराकी

महापालिका, नगरपरिषदांमध्ये लवकरच ४० हजार पदांची भरती

एलएमएलचे इ-स्कूटरने कमबॅक

काबूल पोलिसांचे मुख्य प्रवक्ते खालिद जद्रान यांनी सांगितले की, या स्फोटात पाच जण ठार झाले असून अनेक जण जखमी झाले आहेत. प्रशिक्षणादरम्यान हा हल्ला झाला. या हल्ल्याचा संयुक्त राष्ट्र आणि विविध देशांनी निषेध केला आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकृत प्रवक्ते अरिंदम बागची यांनी ट्विट करून शोक व्यक्त केला आहे. अरिंदम बागची म्हणाले, “भारत काबूलमधील दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करतो, ज्यात अनेक निष्पाप नागरिकांचे प्राण गेले आणि अनेक जण जखमी झाले. आम्ही शोकग्रस्त कुटुंबांप्रती तीव्र संवेदना व्यक्त करतो आणि जखमींना लवकरात लवकर बरे व्हावे अशी प्रार्थना करूया.”

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा