33 C
Mumbai
Friday, April 19, 2024
घरदेश दुनियाब्रिटनच्या पंतप्रधान लिझ ट्रस यांनी दिला राजीनामा

ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ ट्रस यांनी दिला राजीनामा

ब्रिटनच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असताना ब्रिटनच्या पंतप्रधानांनी राजीनामा दिल्याचे वृत्त समोर आले आहे.

Google News Follow

Related

ब्रिटनच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असताना ब्रिटनच्या पंतप्रधानांनी राजीनामा दिल्याचे वृत्त समोर आले आहे. ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ ट्रस यांनी राजीनामा दिला आहे. केवळ सहा आठवड्यांमध्ये त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. लिझ ट्रस या ब्रिटनच्या इतिहासातील सर्वात कमी कालावधी लाभलेल्या पंतप्रधान ठरल्या आहेत.

लिझ ट्रस सरकारने मांडलेल्या मिनी बजेटनंतर देशभरात कर रचनेवरुन गोंधळ झाला होता. या बजेटवरून ब्रिटनच्या अर्थमंत्र्यांना आणि पंतप्रधान लिझ ट्रस यांच्या विरोधात संतापाचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यात आता लिझ ट्रस यांनी राजीनामा दिला आहे.

वादग्रस्त ‘मिनी बजेट’ मधील कररचनेवर माघार घ्यावी लागत असल्याने ट्रस यांनी अर्थमंत्री क्वासी क्वारतेंग यांची हकालपट्टी केली होती. ‘मिनी बजेट’मधील कररचनेमुळे ब्रिटनची अर्थव्यवस्था प्रचंड धोक्यात आली आहे. त्यानंतर ‘यू-जीओव्ही’ या संकेतस्थळाने केलेल्या सर्वेक्षणानुसार पक्षाच्या ६२ टक्के सदस्यांनी चुकीचा नेता निवडल्याची भावना व्यक्त केली होती. दुसरीकडे अर्थमंत्री क्वारतेंग यांनी राजीनामा दिल्याची बातमी होती. मात्र, त्यांची ट्रस यांनीच हकालपट्टी केल्याचे समोर आले आहे. त्यांनी स्वत:च ट्विटरवर आपले राजीनामापत्र टाकले आहे. त्यानुसार ट्रस यांनी क्वारतेंग यांना राजीनामा देण्यास सांगितल्याचे स्पष्ट झाले होते.

हे ही वाचा:

पाकवर वचक ठेवायला भारत- पाकिस्तान सीमेलगत नवा एअरबेस

पनवेल येथून पीएफआयच्या पदाधिकाऱ्यासह तिघांना अटक

भारताविरोधी वक्तव्य करणाऱ्या ब्रिटनच्या गृहमंत्र्यांचा राजीनामा

समीर वानखेडेंनी केलेल्या तक्रारीची राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडून दखल

त्यानंतर आज गृहमंत्री सुएला यांनी सरकारी नियमांचे उल्लंघन केल्याचं सांगत राजीनामा दिला. गेल्या आठवडाभरात ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ ट्रस यांच्या मंत्रिमंडळातील दुसऱ्या मंत्र्याने राजीनामा दिला होता. सुएला ब्रेव्हरमन यांनी सरकारी दस्तऐवज लीक केल्याचा आरोप होता. सुएला ब्रेव्हरमन या भारतीय वंशाच्या असून त्यांनी भारताविरोधी वक्तव्य केल्यामुळे त्या गेल्या काही काळापासून चर्चेत होत्या.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा