शनिवारी रात्री UEFA चॅम्पियन्स लीग फायनलमध्ये पॅरिस सेंट-जर्मेन (PSG) ने विजय मिळविल्यानंतर पॅरिसमधील आनंदोत्सवाला गालबोट लागले. शहरभर ठिकठिकाणी दंगल उसळली आणि चाहत्यांमध्ये व पोलिसांमध्ये तीव्र झटापट झाली.
AFP च्या माहितीनुसार, किमान दोन जणांचा मृत्यू झाला आहे आणि जवळपास ५५९ जणांना अटक करण्यात आली आहे. ही दंगल चँप्स-एलीसीज अॅव्हेन्यू आणि Parc des Princes स्टेडियमजवळ झाली, जिथे सुमारे ५०,००० लोकांनी मोठ्या स्क्रीनवर सामना पाहिला होता. PSG ने UEFA चॅम्पियन्स लीगच्या अंतिम फेरीत इंटर मिलान या इटालियन क्लबचा ५-० ने पराभव केल्यानंतर ही हुल्लडबाजी सुरु झाली.
हे ही वाचा:
भारतीय महिला रिले संघाने आशियाई चषकात रौप्यपदक जिंकले!
खडगेंनी राफेलची नाही, काँग्रेसची चिंता करावी!
सिंधू पाणी करारावरून भारताला दोष देणे थांबवा!
हुल्लडबाजांनी फटाके आणि फ्लेअर्स पेटवले, बस थांबे फोडले, आणि गाड्यांना आग लावली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फुटेजमध्ये शहरात अराजकता, जळणाऱ्या गाड्या, पोलिसांवर हल्ला आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान दिसून येते. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधुर, नॉन-लेटल ऍम्युनिशन आणि वॉटर कॅननचा वापर केला.
PSG चा आघाडीचा खेळाडू उस्मान डेंबेलें याने चाहत्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. “आपण जल्लोष करूया, पण पॅरिसचे नुकसान न करता,” असे त्याने Canal Plus ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले. फ्रान्सचे अंतर्गत व्यवहार मंत्री ब्रुनो रेटायो यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली, “अनेक हजार गुन्हेगार दुकानं लुटत आहेत, जे दिसेल ते नष्ट करत आहेत आणि पोलिस व अग्निशमन दलावर हल्ला करत आहेत. “PSG चे खरे चाहते त्यांच्या संघाच्या शानदार कामगिरीबद्दल आनंदित आहेत. पण दुसरीकडे, काही असभ्य लोक पॅरिसच्या रस्त्यांवर हिंसाचार करत आहेत,” असेही त्यांनी स्पष्ट केले.







