25 C
Mumbai
Tuesday, December 30, 2025
घरक्राईमनामाभारताचा मोठा दुश्मन हाफिज अब्दुल रहमान मक्कीचा मृत्यू

भारताचा मोठा दुश्मन हाफिज अब्दुल रहमान मक्कीचा मृत्यू

हृदयविकाराच्या झटक्याने पाकिस्तानमध्ये मृत्यू झाल्याची माहिती

Google News Follow

Related

मुंबई २६/११ दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि लष्कर-ए-तोयबाचा (एलईटी) उपप्रमुख हाफिज अब्दुल रहमान मक्की याचा शुक्रवार, २७ डिसेंबर रोजी मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. हृदयविकाराच्या झटक्याने पाकिस्तानमध्ये त्याचा मृत्यू झाला असे वृत्त आहे. मक्की हा गेल्या काही दिवसांपासून आजारी होता आणि त्याच्यावर लाहोरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

अब्दुल रहमान मक्की हा दहशतवादी हाफिज सईदचा नातेवाईक होता. अमेरिकेने मक्कीला जागतिक दहशतवादी घोषित केले आहे. तो भारतात हवा होता. अब्दुल रहमान मक्की हा लष्कर-ए-तैयबाच्या टेरर फंडिंगवर लक्ष ठेवायचा. मे २०१९ मध्ये, मक्कीला पाकिस्तान सरकारने अटक केली आणि लाहोरमध्ये नजरकैदेत ठेवले होते. २०२० मध्ये, एका पाकिस्तानी न्यायालयाने त्याला दहशतवादी वित्तपुरवठ्याशी संबंधित प्रकरणांमध्ये दोषी ठरवले आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावली. जानेवारी २०२३ मध्ये, मक्कीला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (UNSC) ने जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले होते. अखेर त्याच्या मृत्यूची माहिती समोर आली आहे.

अब्दुल रहमान मक्की हा लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज मुहम्मद सईद याचा मेहुणा आहे. शिवाय लष्कर-ए-तोयबाच्या अनेक कारस्थानांचं याने म्होरक्या म्हणून काम पाहिलेलं आहे. शिवाय लष्कर-ए-तोयाबासाठी फंड मिळवण्याचं काम करण्यामध्ये मक्कीची भूमिका होती. दहशतवादी संघटनेमध्ये तरुणांची भरती करायची, त्यांना कट्टरपंथी बनवायचं, हल्ल्याची योजना आखायची अशी कामं हा मक्की करायचा. विशेषतः जम्मू काश्मीरमध्ये हिंसाचार घडवण्यामध्ये याची प्रमुख भूमिका होती.

हे ही वाचा:

मनमोहन सिंग एक दयाळू व्यक्ती, अभ्यासू अर्थतज्ञ आणि सुधारणांना समर्पित नेते म्हणून स्मरणात राहतील

दिल्ली विद्यापीठात हिंदू अभ्यासात पीएचडी कार्यक्रम सुरू होणार

“डॉ. मनमोहन सिंग यांच्याशी चर्चा करताना बुद्धिमत्ता आणि विनम्रतेचे दर्शन घडायचे”

जोपर्यंत द्रमुक सरकार पाडले जात नाही, तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही!

भारतात डिसेंबर २००० मध्ये लाल किल्ल्यावर झालेला दहशतवादी हल्ला, रामपूर सीआरपीएफ कॅम्पवर जानेवारी २००८ मध्ये झालेला हल्ला, मुंबईत २६ नोव्हेंबर रोजी झालेला दहशतवादी हल्ला, त्यानंतर श्रीनगरमधल्या करन नगर इथे फेब्रुवारी २०१८ मध्ये हल्ला झाला होता, मे २०१८ ला बारामुल्ला इथल्या खानपोरामध्ये हल्ला झाला होता, जून २०१८मध्ये श्रीनगरमध्ये हल्ला झाला आणि ऑगस्ट २०१८मध्ये बांदीपोरा इथे हल्ला झाला होता. या सगळ्या हल्ल्यांची जबाबदारी लष्कर-ए-तोयबाने घेतल्यामुळे अब्दुल रहमान मक्कीचा नक्कीच या हल्ल्यांमध्ये सहभाग होता, असे बोलले जाते.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
285,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा