दिल्ली विद्यापीठाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून म्हणजेच २०२५- २०२६ या शैक्षणिक वर्षापासून हिंदू अभ्यासात पीएचडी कार्यक्रम सुरू करण्याची योजना आखली आहे. सेंटर फॉर हिंदू स्टडीजच्या प्रशासकीय समितीच्या शिफारशीनुसार विद्यापीठाच्या स्थायी समितीने हा प्रस्ताव मांडला होता.
दिल्ली विद्यापीठात पीएचडी कार्यक्रम चालू शैक्षणिक सत्रापासून सुरू करण्याचे नियोजन होते परंतु, नंतर पुढे ढकलण्यात आले. विद्यार्थ्यांना संधी निर्माण करणे हा या नवीन उपक्रमामागील उद्देश आहे. सेंटर फॉर हिंदू स्टडीजच्या सहसंचालक म्हणून काम करणाऱ्या प्रेरणा मल्होत्रा यांनी बोलताना सांगितले की, “विद्यार्थी केंद्राकडे येत आहेत आणि संशोधनाच्या संधींबद्दल विचारपूस करत आहेत. विशेषतः असे विद्यार्थी जे आरएफ आणि नेट हिंदू स्टडीजमध्ये आधीच पात्र आहेत.” पुढे त्या म्हणाल्या की, “एक प्रमुख संस्था म्हणून, दिल्ली विद्यापीठ अशा संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि हिंदू अभ्यासाच्या विविध क्षेत्रांमध्ये संशोधनाला प्रगती करण्यासाठी वचनबद्ध आहे.
हे ही वाचा:
“डॉ. मनमोहन सिंग यांच्याशी चर्चा करताना बुद्धिमत्ता आणि विनम्रतेचे दर्शन घडायचे”
जोपर्यंत द्रमुक सरकार पाडले जात नाही, तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही!
पाकिस्तानने पोसलेले १५ हजार तालिबान्यांची पाकिस्तानवरच कूच
शक्य असतं तर विशाल गवळीचा चौरंगच केला असता!
या अभ्यासक्रमाविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, पीएचडी कार्यक्रमासाठी सुरुवातीला साधारण १० जागा उपलब्ध असतील. शैक्षणिक आवश्यकता आणि सेंटर फॉर हिंदू स्टडीजच्या पायाभूत सुविधांच्या आधारे आगामी सत्रांमध्ये जागा वाढवल्या जाऊ शकतात.