पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवार, २७ डिसेंबर रोजी नवी दिल्ली येथून एका व्हिडिओ संदेशात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले. नरेंद्र मोदी म्हणाले की, “माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाच्या वृत्तामुळे आपल्या सर्वांच्या हृदयाला खोल जखम झाली आहे. डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन हे देशासाठी मोठे नुकसान आहे. फाळणीच्या त्या काळात खूप काही गमावून भारतात येणं आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळवणे ही सामान्य कामगिरी नाही. प्रतिकूल परिस्थितीमध्येही यशाची उंची कशी गाठायची हे डॉ. मनमोहन सिंग यांचे जीवन भावी पिढ्यांना शिकवत राहील,” असं नरेंद्र मोदी म्हणाले.
“डॉ. मनमोहन सिंग हे एक दयाळू व्यक्ती, अभ्यासू अर्थतज्ञ आणि सुधारणांना समर्पित नेते म्हणून नेहमीच स्मरणात राहतील. एक अर्थशास्त्रज्ञ म्हणून डॉ. मनमोहन सिंग यांनी भारत सरकारसाठी विविध स्तरांवर योगदान दिले. आव्हानात्मक काळात रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून डॉ. मनमोहन सिंग यांनी उत्तम भूमिका बजावली. माजी पंतप्रधान आणि भारतरत्न श्री पीव्ही नरसिंह राव यांच्या सरकारमधील अर्थमंत्री या नात्याने डॉ. मनमोहन सिंग यांनी देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढले आणि नव्या आर्थिक मार्गावर नेले,” असे पंतप्रधानांनी म्हटले. पंतप्रधान या नात्याने देशाच्या विकासात आणि प्रगतीसाठी डॉ. मनमोहन सिंग यांचे योगदान सदैव स्मरणात राहील, असेही नरेंद्र मोदी म्हणाले. तसेच पुढे नरेंद्र मोदी म्हणाले की, डॉ. मनमोहन सिंग यांची जनतेशी आणि देशाच्या विकासाप्रती असलेली बांधिलकी कायमच महत्त्वाची आहे.
डॉ. मनमोहन सिंग यांचे जीवन त्यांच्या प्रामाणिकपणा आणि साधेपणाचे प्रतिबिंब असल्याचे नरेंद्र मोदींनी अधोरेखित केले. डॉ. मनमोहन सिंग यांची प्रतिष्ठित संसदीय कारकीर्द त्यांच्या नम्रता, सौम्यता आणि बुद्धिमत्तेने दर्शविली होती. त्यांच्या शारीरिक आव्हानांना न जुमानता डॉ. मनमोहन सिंग यांनी व्हीलचेअरवर बसून महत्त्वाच्या सत्रांना उपस्थिती दर्शवली आणि त्यांची संसदीय कर्तव्ये पार पाडली, अशी आठवण नरेंद्र मोदींनी सांगितली.
हे ही वाचा:
दिल्ली विद्यापीठात हिंदू अभ्यासात पीएचडी कार्यक्रम सुरू होणार
“डॉ. मनमोहन सिंग यांच्याशी चर्चा करताना बुद्धिमत्ता आणि विनम्रतेचे दर्शन घडायचे”
जोपर्यंत द्रमुक सरकार पाडले जात नाही, तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही!
पाकिस्तानने पोसलेले १५ हजार तालिबान्यांची पाकिस्तानवरच कूच
प्रतिष्ठित जागतिक संस्थांमधून शिक्षण घेतल्यानंतर आणि उच्च सरकारी पदे भूषवूनही डॉ. मनमोहन सिंग आपल्या नम्र पार्श्वभूमीची मूल्ये कधीच विसरले नाहीत, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. डॉ. मनमोहन सिंग नेहमी पक्षीय राजकारणापेक्षा वरचेवर होते, सर्व पक्षांतील व्यक्तींशी संपर्क ठेवत आणि सर्वांना सहज उपलब्ध होते. मुख्यमंत्री असताना आणि नंतर दिल्लीत त्यांच्याशी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर त्यांनी केलेल्या खुल्या चर्चेची आठवण पंतप्रधान मोदींनी सांगितली. तसेच नरेंद्र मोदींनी डॉ. मनमोहन सिंग यांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केला आणि सर्व नागरिकांच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहिली.