क्षारसूत्र आणि भगंदर हा आयुर्वेदाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा विषय असून त्यासंदर्भात सॅन दिएगो, अमेरिका येथे सादरीकरणाची संधी डॉ. निलेश दोशी यांना मिळाली. त्या माध्यमातून अमेरिकेत आयुर्वेदाचे महत्त्व डॉ. दोशी यांनी सांगितले.
याबाबत डॉ. दोशी म्हणाले की, माझ्यासाठी ही एक खूप मोठी संधी आणि सन्मानाची गोष्ट होती की मला “क्षारसूत्र आणि भगंदर (Fistula-in-Ano)” या विषयावर पहिली पॉडियम प्रेझेंटेशन देण्याची संधी अमेरिकन सोसायटी ऑफ कोलन अँड रेक्टल सर्जन्स (ASCRS) च्या १२६व्या वार्षिक अधिवेशनात, सॅन डिएगो, यूएसए येथे मिळाली.

हे ही वाचा:
‘मला गोळ्या घाला, इथेच गाडून टाका’
“आली रे आली… आता इंग्लंडची वेळ आली!”
पंतच्या शतकी खेळीवर जहीर खान खूश
अचूक शूटआउट आणि कनिकाचा झंझावात!
डॉ. दोशी हे मालाड (पू) येथील देवांगी हॉस्पिटलचे पाइल्स व भगंदर तज्ज्ञ आहेत.
हे अधिवेशन जगातील कोलन आणि रेक्टल सर्जन्सचे सर्वात मोठे आणि प्रतिष्ठित व्यासपीठ असून यामध्ये ४२०० पेक्षा अधिक सदस्य आहेत आणि या वर्षी २८०० पेक्षा अधिक प्रतिनिधींनी सहभाग घेतला.
डॉ. दोशी म्हणाले की, आयुर्वेदाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याचा मला खूप अभिमान वाटतो. भगंदर यासारख्या गुदमार्ग विकारांवरील आयुर्वेदातील प्राचीन पण प्रभावी उपाययोजना जगासमोर मांडता आल्या, याचा विशेष आनंद आहे. ही तर सुरुवात आहे. आयुर्वेदाकडे जगाला देण्यासारखे खूप काही आहे. याबाबत मला पाठिंबा देणाऱ्या, मार्गदर्शन करणाऱ्या व शुभचिंतकांचे खूप आभार!







