27 C
Mumbai
Sunday, June 15, 2025
घरविशेषपाकिस्तान संपूर्ण जगात दहशतवाद पसरवतो !

पाकिस्तान संपूर्ण जगात दहशतवाद पसरवतो !

शिवसेना खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांची आंतरराष्ट्रीय मंचावरून पाकिस्तानवर सडकून टीका

Google News Follow

Related

भारत जगाला प्रतिभा आणि तंत्रज्ञान पुरवतो मात्र याउलट पाकिस्तान जगात दहशतवाद पसरवतो. भारत जगांतर्गत व्यापार मार्ग तयार करतो तर पाकिस्तान दहशतवादाचे मार्ग तयार करतो; भारत चंद्रयान आणि इतर उपग्रह प्रक्षेपित करतो, तर पाकिस्तान आपल्या भूमीवरून इतर देशांमध्ये दहशतवादी पाठवतो. अशी परखड टीका करत शिवसेना खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी आतंरराष्ट्रीय मंचावरून पाकिस्तानला लक्ष्य करत पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणला. तर गेल्या अनेक दशकांपासून भारताने दहशतवादी हल्ले सहन केले आहे. मात्र आता भारत दहशहतवाद सहन करणार नाही. प्रत्येक दहशतवादी कारवाईला चोख प्रत्युत्तर दिले जाईल. असा इशारा देखील त्यांनी पाकिस्तानला दिला.

यूएईच्या यशस्वी दौऱ्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने नुकताच काँगो लोकशाही प्रजासत्ताक देशाचा दौरा केला. यावेळी त्यांनी काँगो प्रजासत्ताकच्या नेत्यांसोबत उच्चस्तरीय बैठका देखील पार पडल्या. काँगो प्रजासत्ताक दौऱ्यात राजकीय नेतृत्वासोबत अनेक उच्चस्तरीय बैठकांना उपस्थिती लावली. या बैठकीदरम्यान काँगो प्रजासत्ताकच्या नेत्यांनी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या कुटुंबांप्रती शोक व्यक्त केला. त्यांनी या दहशतवादी कृत्यांचा तीव्र निषेध करत, कोणत्याही परिस्थितीत अशा हिंसाचाराचं समर्थन करता येणार नाही, हे स्पष्ट केले. त्यांनी दहशतवादाच्या जागतिक संकटाविरोधात लढण्याची कटिबद्धता व्यक्त केली आणि भारतासोबत सहकार्य करण्याची तयारी दर्शवली.

परराष्ट्र राज्यमंत्री श्रीमती थेरेस वाग्नर यांनी भारताने सीमापार दहशतवादासंदर्भातील माहिती दिल्याबद्दल आभार मानले. भारताच्या दहशतवादाविरोधातील लढ्यात काँगो प्रजासत्ताक पूर्णपणे पाठिशी असल्याचे सांगितले. त्यांचे लोकसभेचे अध्यक्ष व्हायटल कामेरे यांनी भारतावरील दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आणि काँगोच्या जनतेने भारताच्या वेदनेत सहभाग असल्याचे सांगितले.

हे ही वाचा : 

रोनाल्ड रेगन यांच्या पत्रातून निशिकांत दुबेंनी काँग्रेसची कोणती पोलखोल केली?

काँग्रेस नेता आणि ऑलिम्पियन बजरंग पूनिया म्हणतो, गुंडगिरीपुढे कायदा हरला!

रोनाल्ड रेगन यांच्या पत्रातून निशिकांत दुबेंनी काँग्रेसची कोणती पोलखोल केली?

“सोडा आणि फळांच्या रसाने वाढतो मधुमेहाचा धोका, सावध रहा!”

या बैठका झाल्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने काँगोमधील भारतीय समुदायासोबत संवाद साधला. ऑपरेशन सिंदूर आणि सीमापार दहशतवादाविरोधातील भारताच्या भूमिका यावर चर्चा झाली. काँगोतील भारतीय समुदायाच्या योगदानाबद्दल प्रतिनिधी मंडळाने विशेष कौतुक व्यक्त केले आणि द्विपक्षीय संबंध दृढ होण्यास त्यांच्या भूमिकेचे महत्त्व मान्य केले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
251,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा