34 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
घरदेश दुनियाएअर इंडिया आली, टाटांच्या पंखांखाली

एअर इंडिया आली, टाटांच्या पंखांखाली

Google News Follow

Related

गुरुवारी एक अत्यंत महत्त्वाची घटना घडली ती म्हणजे एअर इंडियाची सगळी सूत्रे टाटा उद्योगसमुहाने स्वतःकडे घेतली. १८ हजार कोटींची बोली जिंकून टाटाने एअर इंडियाला आपल्या पंखाखाली घेतले होते.

६९ वर्षांनी पुन्हा एकदा ही विमानसेवा टाटाकडे परतली आहे. गेल्या वर्षी ८ ऑक्टोबरला केंद्र सरकारने टाटाच्या टॅलेस प्रा. लि. कंपनीकडे एअर इंडियाची सूत्रे सोपविली.

यासंदर्भात टाटा सन्सचे चेअरमन नटराजन चंद्रशेखरन यांनी सांगितले क, एअर इंडियाचा सुवर्णकाळ वाट पाहात आहे. सगळ्या देशाचे लक्ष टाटा समुहाकडे आहे आणि ते हे लक्ष्य कसे साध्य करतात, याची लोक प्रतीक्षा करत आहेत. संध्याकाळी चंद्रशेखरन यांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना पत्र लिहून शुभेच्छा दिल्या आणि आपल्या भावना कळविल्या.

त्यांनी पत्रात म्हटले आहे की, भूतकाळात जे उत्तम होते त्याचे जतन करणे, नवनवे बदल करून ते जपणे महत्त्वाचे असते. देदिप्यमान इतिहासाचा तो सन्मान असतो. आता संपूर्ण भारताचे लक्ष आपल्याकडे लागून राहिले आहे. आपण एकत्र येऊन काय ध्येय गाठू शकलो याची लोक प्रतीक्षा करत आहेत.एअर इंडियातील कर्मचारी संघटनांनीही या नव्या पर्वाचे स्वागत केले आहे. टाटा समुहाकडून त्यांनी अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. चंद्रशेखरन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली.

हे ही वाचा:

परमबीर सिंग यांना एसीबीकडून तिसरे समन्स..

कशाला हवी मर्दपणाची चर्चा ?

माहीमच्या बांधकाम व्यावसायिकाला गँगस्टर गुरू साटमच्या नावे फोन

काल्का शिमला रेल्वे मार्गावर बर्फाचे पांघरूण

 

आता ही नवी वाटचाल करत असताना एअर इंडियाच्या विमानाती  पायलट्सनाही उद्घोषणा करताना काय बोलायचे त्याविषयी पत्र पाठविण्यात आले आहे.

त्यात नमूद केले आहे की, प्रिय प्रवासी, मी विमानाचा कप्तान बोलत आहे. तुमचे विमानात स्वागत आहे. आज तब्बल सात दशकानंतर पुन्हा एकदा एअर इंडियाचा ताबा टाटा उद्योगसमुहाकडे आला आहे. एअर इंडियाच्या नव्या वाटचालीचे स्वागत. तुम्हाला सर्व सुविधा उपलब्ध करून देताना आम्हाला आनंद होत आहे.

टाटांनी १९३२मध्ये एअर इंडिया ही विमानसेवा सुरू केली पण १९५३मध्ये पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी एअर इंडियाचे राष्ट्रीयीकरण केले. त्यानंतरच्या काळात एअर इंडिया हळूहळू कर्जात बुडत गेली. शेवटी पुन्हा एकदा टाटा उद्योगसमुहाकडेच या विमानसेवेची जबाबदारी आली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा