हमासने गुरुवारी आपला लष्करी नेता मोहम्मद डिफ हा इस्रायलने केलेल्या हल्ल्यात ठार झाल्याची पुष्टी केली. इस्रायल संरक्षण दलाच्या घोषणेनंतर काही महिन्यांनंतर हमासने त्यांच्या बाजूने या माहितीची कबुली दिली आहे. हमासचे प्रवक्ते अबू ओबेदा यांनी एका व्हिडिओ निवेदनात डिफच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. तसेच त्यांनी हमासच्या लष्करी शाखेच्या उप कमांडर गाझी अबू तमा याच्या मृत्यूचीही पुष्टी केली आहे. लढाऊ समर्थन प्रमुख; राड थाबेट, लष्करी शाखा प्रमुख; खान युनूस ब्रिगेडचा कमांडर रफाआ सलामेह; अयमान नोफल, सेंट्रल गाझा ब्रिगेडचा कमांडर; आणि उत्तर गाझा ब्रिगेडचा कमांडर अहमद घंडौर.
गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये इस्रायलने जाहीर केले की, त्यांनी खान युनिस परिसरात १३ जुलै रोजी केलेल्या हवाई हल्ल्यात मोहम्मद डिफ मारला गेला आहे. एक्सवरील एका पोस्टमध्ये, इस्रायली सैन्याने सांगितले की, “आम्ही आता पुष्टी करू शकतो की मोहम्मद डिफला ठार करण्यात आले. इस्रायलच्या लष्कराने सांगितले की, गेल्या काही तासांत त्याच्या मृत्यूची पुष्टी करणारी गुप्तचर माहिती मिळाली. १३ जुलै रोजी खान युनिस भागात हमासच्या खान युनूस ब्रिगेडचा कमांडर रफाआ सलामेहच्या कंपाऊंडवर केलेल्या हल्ल्यात डिफला लक्ष्य करण्यात आले होते, असे द टाईम्स ऑफ इस्रायलचे वृत्त आहे.
दरम्यान, हमास आणि इस्रायल यांच्यात झालेल्या करारानुसार ११० पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका केली. इस्रायलने पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करण्यास विलंब केला होता आणि ओलिसांच्या सुरक्षेची हमी मिळेपर्यंत कैद्यांची सुटका केली जाणार नाही, असे सांगितले होते. ज्या दहशतवाद्यांची सुटका केली जाणार आहे, त्यांची सुटका पुढील टप्प्यात ओलीसांची सुरक्षित सुटका होईपर्यंत विलंब करण्याचे आदेश पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी आणि संरक्षण मंत्री इस्रायल कॅट्झ यांनी दिले आहेत.
हे ही वाचा :
मुंबईच्या चेंबूर भागात मेट्रोचे बांधकाम कोसळले; जीवितहानी नाही
जरांगे यांचे उपोषण अस्त्र आता म्यान, समोरासमोर लढाई करणार!
प्रयागराज: महाकुंभ परिसरात पुन्हा आग!
ही ‘तोंड पाटील’की बंद कधी होणार ?
७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासने दक्षिण इस्रायलवर हल्ला केला. १,२०० हून अधिक लोक मारले गेले. अनेक जखमी झाले आणि २०० हून अधिक लोकांचे अपहरण झाले. इस्रायलच्या हमासविरुद्धच्या हल्ल्यात गाझामध्ये ४६,००० हून अधिक पॅलेस्टिनी मारले गेले आहेत.