25 C
Mumbai
Wednesday, February 4, 2026
घरदेश दुनियाहमासकडून पुन्हा युद्धबंदीचे उल्लंघन, नेत्यानाहुंचे तात्काळ आणि शक्तिशाली हल्ल्याचे आदेश!

हमासकडून पुन्हा युद्धबंदीचे उल्लंघन, नेत्यानाहुंचे तात्काळ आणि शक्तिशाली हल्ल्याचे आदेश!

इस्रायल पंतप्रधान कार्यालयाने दिली माहिती 

Google News Follow

Related

हमासकडून वारंवार युद्धबंदीचे उल्लंघन झाल्याच्या पार्श्वभूमीवर इस्रायलने पुन्हा एकदा लष्करी कारवाईचा मार्ग स्वीकारला आहे. मंगळवारी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी इस्रायल संरक्षण दलांना (IDF) गाझा पट्टीत “तात्काळ आणि शक्तिशाली हल्ले” करण्याचे आदेश दिले.

इस्रायल पंतप्रधान कार्यालयाने मंगळवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे, “पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी आयडीएफला गाझा पट्टीवर त्वरित आणि शक्तिशाली हल्ले करण्याचे निर्देश दिले आहेत.” ही घोषणा (नेतान्याहूंच्या हल्ल्याच्या आदेशाची घोषणा) त्या बैठकीनंतर केली गेली, ज्या बैठकीत इस्रायल सरकार आणि लष्करी अधिकारी हमासने युद्धबंदीचे नियम मोडल्यावर इस्रायलने काय प्रतिक्रिया द्यावी- यावर चर्चा करत होते. दक्षिण गाझा प्रदेशात इस्रायली सैन्यावर हल्ला झाल्यानंतर लगेचच हे पाऊल उचलण्यात आले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूंमध्ये ओलिसांच्या मृतदेहांच्या परतफेडीच्या मुद्द्यावरून वाद आणखी चिघळला आहे. इस्रायली अधिकाऱ्यांनी दावा केला की, हमासने ओलिसांच्या मृतदेहांच्या परतफेडीशी संबंधित कराराचे उल्लंघन केले आहे. या कथित उल्लंघनामुळे इस्रायलमध्ये सार्वजनिक संताप आणि राजकीय दबाव वाढला आहे. हमासच्या सशस्त्र शाखेने, अल-कसम ब्रिगेड्सने त्याच दिवशी निवेदन जारी करून म्हटले की, ते बेपत्ता इस्रायली ओलिसाच्या मृतदेहाचे नियोजित हस्तांतरण पुढे ढकलत आहेत.

गटाने असा आरोप केला की, “इस्रायलनेच गाझा युद्धबंदीचे उल्लंघन केले आहे, त्यामुळे मृतदेहांचे हस्तांतरण तात्पुरते स्थगित करण्यात येत आहे.” टेलिग्रामवरील निवेदनात, अल-कसम ब्रिगेड्सने इशारा दिला की, “इस्रायली हल्ल्यांमुळे आमच्या शोध आणि पुनर्प्राप्ती प्रयत्नांना अडथळा येत आहे. त्यामुळे इस्रायली सैनिकांचे मृतदेह परत करण्यात आणखी विलंब होऊ शकतो.”

हे ही वाचा : 

राष्ट्रपती ‘राफेल’ विमानातून उड्डाण करणार

टीबी बद्दल ‘द लॅन्सेट’चा अहवाल काय म्हणतो ?

छोट्या छोट्या सवयीने वाढेल कोलेस्ट्रॉल

देशासाठी एसआयआर गरजेचे

थोड्याच वेळात हमासने इस्रायलवर “गाझामध्ये नवीन आक्रमक कारवायांसाठी खोट्या सबबी निर्माण करण्याचा प्रयत्न” केल्याचा आरोप केला. तसेच इस्रायलवर गाझामधील मृतदेह शोधण्याच्या प्रयत्नांना अडथळा आणल्याचा आरोपही करण्यात आला आणि हमासने आंतरराष्ट्रीय मध्यस्थांना आवाहन केले की त्यांनी “राजकीय आणि आक्रमक दबावांपासून दूर राहून आपली मानवतावादी भूमिका पार पाडावी.”

 

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
290,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा