31 C
Mumbai
Sunday, February 1, 2026
घरक्राईमनामा४५ लाख खर्च करून अमेरिकेत गेलेल्या तरुणाची हत्या

४५ लाख खर्च करून अमेरिकेत गेलेल्या तरुणाची हत्या

सार्वजनिक ठिकाणी लघवी करण्यापासून रोखल्याचा राग

Google News Follow

Related

अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे हरियाणातील एका तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. एका पुरूषाला सार्वजनिक ठिकाणी लघवी करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केल्यामुळे या तरुणाची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पीडित तरुणाचे नाव कपिल असे होते.

पीडित तरुण हा हरियाणाच्या जिंद जिल्ह्यातील बाराह कला गावातील होता. कपिल याला गोळी लागल्यानंतर तो रस्त्यावर कोसळला आणि नंतर रुग्णालयात त्याला मृत घोषित करण्यात आले, अशी माहिती पोलिसांनी कपिलच्या नातेवाईकांना दिली आहे. अद्याप या प्रकरणातील संशयिताचे नाव जाहीर केलेले नाही किंवा आरोपीला अटक करण्यात आली आहे की नाही हे ही सांगितलेले नाही.

कपिलने एका पुरूषाला उघड्यावर लघवी करू नये असे सांगितले आणि त्यासाठी त्याला गोळी मारण्यात आली, असे एका नातेवाईकाने सांगितले. गोळीबारानंतर प्रत्यक्षदर्शींनी तातडीने पोलिसांना याची माहिती दिली. कपिलला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, परंतु उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

हे ही वाचा : 

बिहारमध्ये मतदार यादीत हिंदू कुटूंबात मुस्लिम नावे

‘उत्तम!! रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्यांवर कर लावाच!’

हनुमान चालीसा पठण कार्यक्रमात दगडफेक; सात जणांच्या आवळल्या मुसक्या

शशी थरूर म्हणतात, भारत झुकेगा नही!

कपिल २०२२ मध्ये ‘डंकी’ मार्गाने अमेरिकेत गेला होता. अमेरिकेत पोहचण्यासाठी त्याने सुमारे ४५ लाख रुपये (५४,००० डॉलर्स) खर्च केले होते. कपिलच्या कुटुंबाने सांगितले की, तो त्यांचा एकमेव वारस होता आणि त्यांना आर्थिक आधार देण्यासाठी परदेशातून काम करत होता. कपिल शेतकरी कुटुंबातला असून त्याचे पार्थिव भारतात परत आणण्यासाठी कुटुंबाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असल्याची माहिती आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
289,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा