29 C
Mumbai
Friday, April 26, 2024
घरदेश दुनियामेलबर्नमध्ये 'विराट' दीपोत्सव, पाकिस्तानविरोधात विजयाचे फटाके

मेलबर्नमध्ये ‘विराट’ दीपोत्सव, पाकिस्तानविरोधात विजयाचे फटाके

टी-२० वर्ल्डकपची सुरुवात दणक्यात

Google News Follow

Related

विराट कोहलीने भारतीय चाहत्यांना दिवाळी भेट दिली आहे. मेलबर्नमध्ये झालेल्या टी-२० वर्ल्डकपच्या आपल्या सलामीच्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर चार विकेट्सनी रोमहर्षक विजय मिळविला आहे. शेवटचा चेंडू आणि एक धावेची गरज असताना रविचंद्रन अश्विन याने एक धाव घेत विजय मिळवून दिला. विराटने ५३ चेंडूत ८२ धावांची नाबाद खेळी करताना फटक्यांची आतषबाजी केली. त्याच्या या नाबाद खेळीत ६ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. हार्दिक पंड्याने त्याला ४० धावा करून चांगली साथ दिली. गोलंदाजी करताना त्याने ३ बळी घेत पाकिस्तानचे कंबरडेही मोडले. अर्षदीप यानेही तीन बळी घेत आशिया कपचा बदला घेतला.

भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने २० षटकांत आठ विकेट्स गमावून १५९ धावा केल्या होत्या. त्याला उत्तर देतांना भारतीय संघाने एका क्षणी ३१ धावांत चार विकेट गमावल्या होत्या. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये थोडी धास्ती निर्माण दिली होती. यानंतर हार्दिक पंड्याने विराट कोहलीसोबत पाचव्या विकेटसाठी ७८ चेंडूत ११३ धावांची भागीदारी केली. शेवटच्या पाच षटकात भारताला विजयासाठी ६० धावांची गरज होती. १६ व्या षटकात सहा धावा आणि १७ व्या षटकात सहा धावा झाल्या.

आठव्या षटकात कोहलीने गियर बदलला आणि शाहीन आफ्रिदीच्या षटकात तीन चौकार मारले. भारताने १८ व्या षटकात १७ धावा केल्या. टीम इंडियाला शेवटच्या दोन षटकांत ३१ धावांची गरज होती. कोहलीने १९ व्या षटकातील शेवटच्या दोन चेंडूंवर दोन षटकार ठोकले. त्या षटकात हरिस रौफ गोलंदाजी करत होता.

हे ही वाचा:

गांधी कुटुंबाला दणका, राजीव गांधी फाउंडेशनचे लायसन्स रद्द

उपग्रहांच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल पंतप्रधान इस्रोबद्दल काय म्हणाले?

शी जिनपिंग तिसऱ्यांदा चीनच्या राष्ट्राध्यक्षपदी

केनियात बेपत्ता असलेल्या दोन भारतीयांची हत्या

भारताला शेवटच्या षटकात १६ धावांची गरज असताना मोहम्मद नवाज गोलंदाजीसाठी आला आणि त्याने पहिल्याच चेंडूवर हार्दिक पंड्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. हार्दिक ३७ चेंडूत ४० धावा करून बाद झाला. कार्तिकने दुसऱ्या चेंडूवर एक धाव घेतली. कोहलीने तिसऱ्या चेंडूवर दोन धावा घेतल्या. पुन्हा एकदा कोहली नवाजच्या गोलंदाजीचा सामना करण्यासाठी सज्ज झाला. हा चेंडू चक्क फुलटॉस होता तोही कंबरेच्या वर. पण कोहलीने तो असा काही टोलवला की चेंडू सीमापार केला आणि सहा धावा मिळाल्या. पण चेंडू नो बॉल असल्यामुळे फ्री हिट मिळाली. यानंतर नवाजने फ्री हिटमध्ये वाईड बॉल टाकला. दुष्काळात तेरावा महिना. चौथ्या चेंडूवर कोहलीने बायमध्ये तीन धावा घेतल्या. भारताला आता दोन चेंडूंत दोन धावा हव्या होत्या धाकधूक वाढली होती. पण पाचव्या चेंडूवर कार्तिक बाद झाला आणि श्वास रोखले गेले. शेवटच्या चेंडूवर दोन धावा हव्या होत्या. पुन्हा पाकिस्तानने माती खाल्ली. नवाजने तो चेंडू वाईड टाकला. आयतीच धाव भारताला मिळाली. पुन्हा एकदा अखेरचा सहावा चेंडू नवाजने टाकला आणि अश्विनने एक धाव घेत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

स्कोअरबोर्ड

पाकिस्तान २० षटकांत ८ बाद १५९ (शान मसूद ना. ५२, इफ्तिकार अहमद ५१, अर्शदीप सिंग ३२-३, हार्दिक पंड्या ३०-३) पराभूत वि. भारत २० षटकांत ६ बाद १६० (विराट कोहली ना. ८२, हार्दिक पंड्या ४०, हारिस रौफ ३६-३, नवाज ४२-२)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा