31 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
घरदेश दुनियाराष्ट्रकुल स्पर्धेत भारताचा दबदबा; १८ पदकांसह भारत सातव्या क्रमांकावर

राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचा दबदबा; १८ पदकांसह भारत सातव्या क्रमांकावर

Google News Follow

Related

इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत (Commonwealth Games) भारतीय खेळाडू चमकदार कामगिरी करत असून भारताच्या खात्यात पदकांची संख्या आता १८ वर पोहचली आहे. पाच सुवर्ण, सहा रौप्य आणि सात कांस्य अशा १८ पदकांसह भारत पदक तालिकेत सातव्या क्रमांकावर आहे.

भारताला स्क्वॉशमध्ये कांस्यपदक

भारताचा स्क्वॉशपटू सौरव घोषाल याने इंग्लंडच्या जेम्स विल्स्ट्रॉपवर दणदणीत विजय मिळवून भारताला कांस्यपदक पटकावून दिले. या सामन्यात सौरवने २-० अशी आघाडी घेत पदक जिंकले. जागतिक स्क्वॉश चॅम्पियनशिपच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचणारा सौरव पहिला भारतीय ठरला होता. त्यानंतर सौरवने आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक जेतेपदे पटकावली आहेत.

ज्युदोमध्ये भारताला तिसरं पदक

भारताच्या तुलिका मान हिने महिलांच्या ७८ किलो वजनी गटात ज्यूदोमध्ये रौप्यपदकाची कमाई केली आहे. स्कॉटलंडच्या सारा ऍडलिंग्टनकडून पराभव पत्करावा लागल्याने तुलिकाला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. उपांत्य फेरीत विजय मिळवल्यावर तिच्याकडून अपेक्षा होत्या. मात्र, तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

वेटलिफ्टिंगमध्ये भारताची कमाई सुरूच

भारताच्या गुरदीप सिंग याने १०९ किलो वरील गटात एकूण ३९० किलो वजन उचलून कांस्यपदक पटकावले. पहिल्याच प्रयत्नात त्याने २०७ किलो क्लीन अँड जर्क उचलले. गुरदीप सिंगने दुसऱ्या प्रयत्नात पाच किलो वाढ करून २१५ किलो क्लीन अँड जर्क उचलण्याचा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी ठरला. त्याने एकूण ३९० किलो वजन उचलले आणि कांस्यपदकाची कमाई केली.

उंच उडीतलं पाहिलं पदक भारताच्या खात्यात

तेजस्वीन शंकरने उंच उडी प्रकारात भारताच्या नावे या स्पर्धेतील पहिले कांस्यपदक मिळवून दिले. त्याने पहिल्याच प्रयत्नात २.१० मीटरच्या उंच उडीचा अडथळा पार केला. पुढे त्याने २.१५ मीटरचा टप्पाही यशस्वीपणे पार केला. पण त्यानंतर त्याच्याकडून झालेल्या एका चुकीमुळे त्याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

हे ही वाचा:

झाडू मारण्याचे काम करता करता त्या स्टेट बँकेत झाल्या सहाय्यक महाव्यवस्थापक

विचार बदलला म्हणून काय ठार माराल? उदय सामंत यांचे प्रत्युत्तर

तालिबानच्या छळामुळे शीखांनी सोडले अफगाणिस्तान; दिल्लीत येणार

अविनाश भोसलेंचा ड्युप्लेक्स फ्लॅट तर छाब्रियांची जमीन जप्त

दरम्यान, भारताच्या महिला क्रिकेट संघानेही उपांत्य फेरी गाठली आहे. भारताच्या महिला संघाने पाकिस्ताननंतर बार्बाडोसवर दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना बार्बाडोससमोर १६३ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या बार्बाडोसच्या संघाला भारताने फक्त ६२ धावा करू दिल्या आणि १०० धावांनी दणदणीत विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली आहे.

त्याचबरोबर भारताने हॉकीमध्ये दमदार विजय मिळवला. तर भारताच्या बॉक्सिंगपटूंनीही चमकदार कामगिरी करत पुढच्या फेरीतील आपले स्थान निश्तिच केले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा