27 C
Mumbai
Wednesday, August 17, 2022
घरधर्म संस्कृतीपंतप्रधान होणार असल्याचे आशीर्वाद घेत राहुल गांधी मंदिरांच्या भेटीवर

पंतप्रधान होणार असल्याचे आशीर्वाद घेत राहुल गांधी मंदिरांच्या भेटीवर

Related

काँग्रेस नेते राहुल गांधी पुन्हा एकदा मंदिरांची वाट चोखाळू लागले आहेत. कर्नाटकमध्ये आता येत्या १० महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत, ते लक्षात घेता त्यांच्या मंदिर वाऱ्या वाढणार याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यातून पंतप्रधानपदी आपणच बसू याचे आशीर्वादही ते मंदिरातील आचार्यांकडून घेऊ लागले आहेत.

कर्नाटकात चित्रदुर्ग येथील मुरुगराजेंद्र मठाला दिलेल्या भेटीत राहुल गांधी यांना लिंगायत समाजाच्या आचार्यांनी आशीर्वाद दिले. लिंगायत समाजाच्या या मंदिराला तुम्ही भेट दिलीत म्हणजे तुम्ही पंतप्रधान होणार असे हावेरी होसामठ स्वामी यांनी म्हटले आहे. पण त्यावर त्या संस्थेचे अध्यक्ष शिवमूर्ती शरनारू यांनी कृपया असे बोलू नका, हे बोलण्याचा हा मंच नव्हे असे सुनावले.

राहुल गांधी यांच्या कपाळी गंध लावून या आचार्यांनी त्यांचे स्वागत केले. आपल्याला लिंगायत समाजाच्या बसवण्णा यांचे विचार आत्मसात करायचे असल्याचे राहुल गांधी यांनी या आचार्यांना सांगितले. त्यासाठी आपल्याला एखादा शिक्षक हवा आहे, असेही सांगायला ते विसरले नाहीत.

हे ही वाचा:

चारधामचा ‘पांडव मार्ग’ पुन्हा यात्रेकरूंसाठी होणार खुला!

मुंबईत सीएनजी ६ रुपयांनी महागला

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत आता २३६ नव्हे २२७च वॉर्ड

नॅशनल हेराल्डचे कार्यालय ईडीकडून सील

 

कर्नाटकमध्ये लिंगायत समाज १७ टक्के आहे. पण परंपरेनुसार ते भाजपाचे मतदार मानले जातात. पण त्यांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी राहुल गांधी यांनी ही भेट घेतली. पुढील वर्षी मे महिन्यात कर्नाटकमध्ये निवडणुका होणार आहेत. सध्या तिथे भाजपाचे सरकार असून ते खाली खेचण्यासाठी राहुल गांधी यांनी मंदिरांच्या भेटीतून निवडणूक जिंकण्याचा मार्ग शोधला आहे.

२०१३ ते २०१८ या कालावधीत काँग्रेसचे सरकार कर्नाटकमध्ये होते. पण २०१८मध्ये जनता दलाच्या मदतीने काँग्रेसने सरकार स्थापन केले. कुमारस्वामी मुख्यमंत्री बनले पण नंतर हे सरकार वर्षभरातच कोसळले. त्यानंतर भाजपाने सरकार स्थापनेचा दावा केला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,914चाहतेआवड दर्शवा
1,919अनुयायीअनुकरण करा
23,100सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा