28.9 C
Mumbai
Friday, April 19, 2024
घरदेश दुनियाधक्कादायक! तालिबानींच्या राज्यात पाण्याची बाटली ३००० रुपयांना

धक्कादायक! तालिबानींच्या राज्यात पाण्याची बाटली ३००० रुपयांना

Google News Follow

Related

अफगाणिस्तानवर सध्याच्या घडीला तालिबानचे वर्चस्व आहे. अफगाणिस्तानातील प्रत्येक बातमीवर त्यामुळे जगातील मीडीयाने लक्ष केंद्रीत केलेले आहे. सध्याच्या घडीला अफगाणिस्तानामध्ये अराजकाचे वातावरण आहे. काबूल विमानतळावर पाण्याची बाटली ४० डॉलरला मिळत आहे. म्हणजेच एका पाण्याच्या बाटलीसाठी भारतीय चलनानुसार सुमारे ३००० रुपये मोजावे लागत आहेत. त्याचवेळी राईस प्लेट १०० डॉलर्सना उपलब्ध आहे. भारतीय चलनात ते ७ हजार ५०० रुपये आहे. एवढ्या महाग किंमतीत अन्न खाणे हे माणसाच्या आवाक्याबाहेर आहे. अशा परिस्थितीत लोकांना उपाशी पोटानेच उन्हात उभे राहणे भाग पडत आहे. यामुळेच अनेकजण बेशुद्ध पडत आहे.

काबूल विमानतळ अजूनही अमेरिकी सैन्याच्या संरक्षणाखाली असून, अजूनही अफगाणिस्तानमधले नागरिक देश सोडण्याची वाट पाहत आहेत. एकीकडे देश सोडण्याची ओढ तर दुसरीकडे जगण्यासाठीही आता तिथले नागरिक लढत आहेत. खाद्यपदार्थांच्या किमती तिथे गगनाला भिडल्या आहेत. सध्याच्या घडीला अफगाणिस्तानात अन्न आणि पाणी सर्वात महाग आहेत. एकप्रकारे, अफगाणिस्तान दुहेरी संकटात सापडले आहेत. एकीकडे तालिबानी दडपशाही आणि दुसरीकडे महागाई.

अमेरिकेसह अनेक देश आपल्या नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. काबूल विमानतळावर गर्दी जमली आहे. वाढत्या गर्दीच्या असहायतेचाही फायदा घेतला जात आहे. विमानतळाजवळ पाण्याच्या बाटलीची किंमत हजारो रुपयांमध्ये आहे यावरून तुम्ही याचा अंदाज लावू शकता. अफगाणिस्तान सोडण्यासाठी हताश लोक काबूल विमानतळाबाहेर मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.

हे ही वाचा:

राणे म्हणतात, नाणार होणारच!

रोनाल्डोची घरवापसी

नाव इनोसंट, पण करत होता पाप!

अखेर राष्ट्रवादीला दिसले रस्त्यावरील खड्डे

सध्या अफगाणिस्तानच्या कडक उन्हामध्ये एक ग्लास पाणी पिणे म्हणजे हजारो रुपये खर्च करणे अशी परिस्थिती सध्या तेथे आहे. विमानतळावर उपस्थित असलेली गर्दी आता मरण्याच्या मार्गावर आहे. खाण्यापिण्याच्या विचारानेच आता नागरिक मरतील की काय याची भीती सध्याच्या घडीला आहे. नागरिकांना मदत करण्याऐवजी तालिबान त्यांना मारहाण करत आहे. तेथील परिस्थिती पूर्णपणे बिघडली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा