30.6 C
Mumbai
Wednesday, June 17, 2026
घरदेश दुनियाइराण करार अद्याप अंतिम नाही; चर्चा फसल्यास पुन्हा बॉम्बहल्ले

इराण करार अद्याप अंतिम नाही; चर्चा फसल्यास पुन्हा बॉम्बहल्ले

ट्रम्प यांचा इशारा

Google News Follow

Related

आपल्या अनपेक्षित स्वभावाप्रमाणेच, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या एका विधानामुळे खळबळ उडाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत प्रस्तावित शांतता कराराबाबत महत्त्वाचे वक्तव्य करत हा करार अद्याप अंतिम झालेला नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. चर्चेतून समाधानकारक तोडगा न निघाल्यास अमेरिका पुन्हा लष्करी कारवाई आणि बॉम्बहल्ल्यांचा मार्ग अवलंबू शकते, असा इशारा त्यांनी इराणला दिला आहे.

फ्रान्समध्ये सुरू असलेल्या जी-७ परिषदेदरम्यान पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, इराणसोबत झालेला सामंजस्य करार (एमओयू) हा केवळ एक प्रारूप करार असून त्याला अद्याप अंतिम स्वरूप देण्यात आलेले नाही. इराणने करारातील अटींचे पालन केले नाही किंवा अमेरिकेला त्यांची भूमिका मान्य झाली नाही, तर अमेरिका पुन्हा कठोर भूमिका घेईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

ट्रम्प यांच्या मते, या करारामुळे मध्यपूर्वेतील तणाव कमी होण्यास मदत होऊ शकते. तसेच जागतिक बाजारपेठेत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून तेलाच्या किमतीतही घट झाली आहे. मात्र, इराणकडून अपेक्षित सहकार्य मिळाले नाही तर परिस्थिती पुन्हा बिघडू शकते, असेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, अमेरिका आणि इराण यांच्यातील प्रस्तावित करारानुसार पुढील ६० दिवस शांतता कायम ठेवून आण्विक कार्यक्रमासह विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली जाणार आहे. या कालावधीत दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार असून, करारावर स्वित्झर्लंडमध्ये अधिकृत स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, इराणने अद्याप कोणताही अंतिम करार झालेला नसल्याचे स्पष्ट केले आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, चर्चा सुरू असल्या तरी अनेक मुद्द्यांवर अजूनही मतभेद कायम आहेत आणि अंतिम निर्णय झालेला नाही.

हे ही वाचा:

भारताची हरित क्रांती; वनविरहित २.१७ कोटी हेक्टर जमीन पुन्हा हिरवीगार

ओमानजवळील सागरी हल्ल्याचे बळी ठरलेल्या दोन भारतीयांचे पार्थिव भारतात रवाना

२०२१ विधानसभा निवडणुकीनंतरच्या हिंसाचार प्रकरणी तृणमूलचे उदयन गुहा अटकेत

इराणच्या तेलवाहू जहाजासह १४ जहाजांनी ओलांडली होर्मुझ सामुद्रधुनी

ट्रम्प यांनी पुन्हा एकदा ठामपणे सांगितले की, इराणला कोणत्याही परिस्थितीत अण्वस्त्रे विकसित करू दिली जाणार नाहीत. हा मुद्दा अमेरिकेसाठी सर्वाधिक महत्त्वाचा असून, भविष्यातील कोणताही करार याच तत्त्वावर आधारित असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. मध्यपूर्वेतील संघर्ष संपवण्यासाठी सुरू असलेल्या या चर्चांकडे जगाचे लक्ष लागले आहे. मात्र, करार अंतिम होईपर्यंत अमेरिका आणि इराण यांच्यातील संबंधांबाबत अनिश्चितता कायम राहणार असल्याचे दिसत आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
315,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा