30.8 C
Mumbai
Wednesday, June 17, 2026
घरदेश दुनियाइराणच्या तेलवाहू जहाजासह १४ जहाजांनी ओलांडली होर्मुझ सामुद्रधुनी

इराणच्या तेलवाहू जहाजासह १४ जहाजांनी ओलांडली होर्मुझ सामुद्रधुनी

होर्मुज सामुद्रधुनीत जहाजांची वर्दळ वाढली

Google News Follow

Related

अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता करारानंतर होर्मुज सामुद्रधुनीतील जहाजांच्या वाहतुकीत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. सागरी विश्लेषण करणाऱ्या विंडवर्ड या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी एकाच दिवशी १४ जहाजांनी होर्मुज सामुद्रधुनी पार केली. या महिन्यातील हा आतापर्यंतचा सर्वाधिक दैनिक आकडा असून, शिपिंग कंपन्यांचा या मार्गावरील विश्वास हळूहळू परत येत असल्याचे संकेत मानले जात आहेत.

अहवालानुसार, अमेरिकन निर्बंधांच्या यादीत समाविष्ट असलेल्या ‘सोफिया-१’ या जहाजानेही होर्मुज सामुद्रधुनी यशस्वीरित्या पार केली. अमेरिकेच्या वित्त विभागाने यापूर्वी या जहाजाचा समावेश इराणच्या तेल वाहतूक नेटवर्कशी संबंधित जहाजांमध्ये केला होता आणि त्यावर दुय्यम निर्बंध लादले होते. समुद्री हालचालींवर लक्ष ठेवणाऱ्या टँकरट्रॅकर्स या संस्थेनुसार, शांतता कराराच्या घोषणेनंतर इराणचे तिसरे तेलवाहू जहाज अमेरिकन नौदलाच्या नाकेबंदीला चकवा देत पुढे गेले आहे. टँकरट्रॅकर्सच्या माहितीनुसार, नॅशनल इराणियन टँकर कंपनी (एनआयटीसी) च्या ‘सोनिया-१’ या टँकरने सुमारे १० लाख बॅरल कच्चे तेल घेऊन प्रवास सुरू केला होता.

याआधी याच आठवड्यात एनआयटीसीची ‘डायोना’ आणि ‘हिरो-२’ ही दोन तेलवाहू जहाजेही अमेरिकन नाकेबंदी पार करण्यात यशस्वी झाली होती. या दोन्ही जहाजांमध्ये मिळून सुमारे ३८ लाख बॅरल इराणी कच्चे तेल होते. मात्र, सध्याची जहाजांची वर्दळ ही युद्धपूर्व काळाच्या तुलनेत अद्याप खूपच कमी आहे. एका अहवालानुसार, संघर्ष सुरू होण्यापूर्वी होर्मुज सामुद्रधुनीतून दररोज सरासरी सुमारे १३० जहाजांची ये-जा होत होती.

हे ही वाचा:

तृणमूलचे माजी आमदार सब्यसाची दत्ता यांची पाच बँक खाती गोठवली

अफगाणिस्तानला भारताकडून ५ टन अत्यावश्यक औषधांची मदत

बंडखोर खासदारांविषयी बोलताना राऊतांची जीभ घसरली

फ्रान्समध्ये आता भारतीय पर्यटकांना यूपीआयद्वारे थेट पेमेंटची सुविधा

विंडवर्डने म्हटले आहे की, अनेक शिपिंग कंपन्यांचा पूर्ण विश्वास अद्याप परतलेला नाही. अनेक जहाज मालकांनी जहाजांवर हल्ल्याचा धोका पूर्णपणे टळेपर्यंत होर्मुज मार्गावरून जहाजे पाठवण्यास टाळाटाळ करण्याची भूमिका घेतली आहे. दरम्यान, रविवारी आपल्या ८० व्या वाढदिवसानिमित्त अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशल वर शांतता कराराची घोषणा केली होती. त्यांनी “समुद्री जहाजांनी पुन्हा इंजिन सुरू करावीत आणि तेलाचा पुरवठा कोणत्याही अडथळ्याविना सुरू राहावा,” असे आवाहन केले होते.

यानंतर इराणनेही सामंजस्य कराराबाबत (एमओयू) आपली भूमिका स्पष्ट केली असून दोन्ही बाजूंनी ई-स्वाक्षऱ्यांची प्रक्रिया पूर्ण झाल्याचे सांगितले जात आहे. या करारावर १९ जून रोजी जिनिव्हा येथे मध्यस्थांच्या उपस्थितीत अधिकृत स्वाक्षऱ्या होण्याची अपेक्षा आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
315,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा