28.1 C
Mumbai
Saturday, October 17, 2026
घरदेश दुनियाइज्ज अल-दिन अल-हद्दाद हमासची धुरा सांभाळणार!

इज्ज अल-दिन अल-हद्दाद हमासची धुरा सांभाळणार!

इस्रायली हल्ल्यात मुहम्मद सिनवार यांचा मृत्यू 

Google News Follow

या महिन्याच्या सुरुवातीला इस्रायली हवाई हल्ल्यात हमासच्या लष्करी शाखेचे प्रमुख मुहम्मद सिनवारच्या मृत्युनंतर इज्ज अल-दीन अल-हद्दाद आता हमासचे संभाव्य नवे नेते म्हणून पाहिले जात आहे. जेरुसलेम पोस्टच्या वृत्तानुसार, अल-हद्दाद हा हमासच्या युद्धपूर्व गाझा नेतृत्वातील सर्वात वरिष्ठ कमांडर आहे आणि तो ऑपरेशनल नियंत्रण हाती घेण्याची अपेक्षा आहे.

२०२४ मध्ये याह्या सिनवार आणि मुहम्मद देईफच्या हत्येपासून हमासचे नेतृत्व करणारा मुहम्मद सिनवार १३ मे रोजी खान युनूस येथील युरोपियन हॉस्पिटलच्या परिसरात झालेल्या अचूक हवाई हल्ल्यात मारला गेला. आयडीएफने या हल्ल्यात रफाह ब्रिगेड कमांडर मुहम्मद शबाना आणि साउथ खान युनूस बटालियन प्रमुख महदी क्वारा याचाही मृत्यू झाल्याची पुष्टी केली.

अल-हद्दाद याने हमासच्या लष्करी परिषदेत दीर्घकाळ काम केले आहे आणि २०२१ पासून गाझा शहरातील इज्ज अल-दिन अल-कसम ब्रिगेड्सचे नेतृत्व केले आहे. नोव्हेंबर २०२३ मध्ये, त्याने हमासच्या उत्तर गाझा ब्रिगेडचे प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले होते. द जेरुसलेम पोस्टच्या मते, ते आता गाझामधील हमासच्या पाच मूळ ब्रिगेड कमांडरपैकी शेवटचे जिवंत सदस्य आहेत.

हे ही वाचा : 

कामगारांना मिळणार डिजिटल न्याय

ऐकण्याच्या क्षमतेतील घट रोखण्यासाठी लसीकरण आवश्यक

कबुतरांना दाणा टाकण्याच्या प्रथेवर राष्ट्रीय हरित लवाद आक्रमक

सोन्याचा दर वाढला; ९७ हजारावर पोहोचले

अल-हद्दाद हा इस्रायली हल्ल्यातून तब्बल सहा वेळा वाचल्याची माहिती आहे. तो ७ ऑक्टोबर २०२३ रोजी इस्रायलवर झालेल्या हल्ल्याचा प्रमुख योजनाकार होता आणि सध्या इस्रायली ओलिस असलेल्या गटावर त्याचे नियंत्रण असल्याचे वृत्त आहे. हमासचे बहुतेक वरिष्ठ नेते मारले गेले असल्याने अल-हद्दाद हा लष्करी रणनीती आणि ओलिसांवर तोडगा काढण्यासाठी नेतृत्व करेल अशी अपेक्षा आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
338,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा