23 C
Mumbai
Thursday, December 11, 2025
घरक्राईमनामापाकिस्तानात जैश- ए- मोहम्मदच्या दहशतवाद्याला ठोकलं

पाकिस्तानात जैश- ए- मोहम्मदच्या दहशतवाद्याला ठोकलं

अज्ञात हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या

Google News Follow

Related

पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांच्या हत्येचे सत्र सुरूच असून पुन्हा एकदा एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे. यावेळी अज्ञात हल्लेखोरांनी जैश- ए- मोहम्मदचा दहशतवादी मौलाना तारिक रहीम उल्लाह तारिक याची हत्या केली आहे. भारतविरोधी रॅलीत सहभागी होण्यासाठी जात असताना त्याची हत्या करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

कराचीमध्ये काही अज्ञात हल्लेखोरांनी तारिकवर गोळ्या झाडल्या. तारिक हा पाकिस्तानचे प्रसिद्ध मौलाना होता आणि त्याला ऐकण्यासाठी हजारो लोक जमा व्हायचे. मौलाना तारिक याच्यावर अचानक गोळ्या झाडण्यात आल्या आणि या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. मौलाना ज्या सभेला हजर राहणार होती ती कराचीच्या ओरंगी टाऊनमध्ये आयोजित करण्यात आली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण टार्गेट किलिंगचे आहे. पाकिस्तानात एकामागून एक दहशतवादी मारले जात आहेत. अलीकडेच खैबर पख्तूनख्वामधील बाजौरमध्ये लष्कर- ए- तैयबाचा दहशतवादी अक्रम खान उर्फ ​​अक्रम गाझी मारला गेला होता. अक्रमची हत्या हा आयएसआय तसेच लष्कर प्रमुख हाफिज सईदसाठी मोठा धक्का असल्याचे बोलले जात होते.

गाझी हा लष्करसाठी भारताविरुद्धचा सर्वात महत्त्वाचा दहशतवादी होता. अक्रम गाझी तरुणांना भारताविरुद्ध भडकावू शकत होता. तो अनेकदा भारताविरुद्ध विष ओकत असे. आतापर्यंत अज्ञात हल्लेखोरांकडून हत्या केल्या जात असलेल्या दहशतवाद्यांमध्ये लष्करचे दहशतवादी होते. पण आता जैशचे दहशतवादीही मारले जात असल्याचे तारिकच्या हत्येवरून स्पष्ट झाले आहे.

हे ही वाचा.. 

भारतात पाचपैकी चार अवयवदात्या महिला!

राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर अयोध्या स्थानकाचाही कायापालट

उत्तराखंडमध्ये निर्माणाआधीच बोगदा कोसळला, ३६ जण अडकल्याची भीती!

संयुक्त राष्ट्रांत पहिल्यांदाच भारताचे इस्रायलविरोधात मत!

या वर्षी मार्चमध्ये, हिजबुल मुजाहिद्दीनच्या एका टॉप कमांडरला अज्ञात हल्लेखोरांनी पाकिस्तानच्या रावळपिंडीमध्ये गोळ्या घालून ठार केले होते. फेब्रुवारीच्या सुरुवातीला, अज्ञात बंदुकधारींनी कराचीत अल-बद्र मुजाहिदीनचा माजी कमांडर सय्यद खालिद रझा याची गोळ्या झाडून हत्या केली होती, ही देखील टार्गेट किलींग असल्याचे पोलिसांनी म्हटले होते.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा