अमेरिकेतील प्रसिद्ध गायिका मेरी मिलबेन् यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या आपल्या अविस्मरणीय भेटीच्या आठवणी आणि अनुभवांबद्दल आयएएनएसला दिलेल्या खास मुलाखतीत सांगितले. या वेळी त्यांनी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाचे मनापासून कौतुक केले. पंतप्रधान मोदींसोबतचा आपला सर्वात संस्मरणीय क्षण सांगताना मिलबेन् म्हणाल्या, “माझ्याकडे त्यांच्या काही छायाचित्रांचा संग्रह आहे. मी पंतप्रधान मोदींचा फार सन्मान करते. माझ्यासाठी सर्वात खास क्षण तो होता, जेव्हा २०२३ मध्ये तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या कार्यकाळात पीएम मोदी अमेरिकेला आले होते. मोदींसमोर गाणे गाण्यापूर्वी मला न्यूयॉर्कमध्ये आयोजित योग दिवसासाठी आमंत्रण मिळाले होते. ते माझ्यासाठी अतिशय सन्मानाची गोष्ट होती. मोदींना एकदम आरामदायी आणि हसऱ्या वातावरणात पाहणे हा माझ्यासाठी पहिलाच अनुभव होता. ते अतिशय दयाळू आहेत आणि त्यांनी तेथे उपस्थित तरुणांशी संवाद साधला. ते पाहून मला खूप आनंद झाला.”
त्या पुढे म्हणाल्या की, “मोदींना योगाभ्यास करताना पाहून मी अत्यंत उत्साहित झाले. ते अतिशय तंदुरुस्त आहेत. तो दिवस माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय दिवसांपैकी एक होता. त्या कार्यक्रमात त्यांनी सहभागी होऊन तरुणांशी संवाद साधला. त्यांची मानवता आणि दयाळूपणा जवळून पाहण्याची मला संधी मिळाली.” स्वतःच्या यश आणि प्रवासाबद्दल बोलताना मेरी मिलबेन् भावूक झाल्या आणि म्हणाल्या, “मला वाटते मी अजूनही शिकत आहे. शिकण्यास आणि अनुभवण्यास अजून बरेच काही बाकी आहे. मी नेहमी विद्यार्थिनी राहू इच्छिते. कदाचित जेव्हा मी ९५ वर्षांची होईन, तेव्हा मला त्याचे उत्तर सापडेल.”
हेही वाचा..
ऊर्जा संक्रमण प्रवास शेतकऱ्यांच्या समृद्धीचा मार्ग
सिलिकॉन व्हॅलीतील विषकन्यांचा अमेरिकेला ताप
‘हलाल’ प्रमाणित ‘मेंटोस’ टॉफी कचराकुंडीत
विनोदी कलाकार सतीश शाह काळाच्या पडद्याआड
वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनातील संतुलनाबद्दल त्या म्हणाल्या, “संतुलन राखणे अत्यंत गरजेचे आहे, विशेषतः तरुणांसाठी. मी सांगू इच्छिते की जीवनात समतोल राखा. कुटुंबाची काळजी घ्या आणि आरोग्याचीही काळजी घ्या. मी आध्यात्मिक दृष्ट्या जोडलेली आहे आणि आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवते. दोन्ही गोष्टींमध्ये संतुलन असावे.” भारत दौरा आणि आगामी प्रकल्पांबद्दल त्या म्हणाल्या, “माझी सर्वात मोठी इच्छा आहे की मी भारतात येऊन येथे परफॉर्म करावा. भारत सरकार आणि आमच्या टीममध्ये याबाबत सतत चर्चा सुरू आहे. थोडा उशीर माझ्याच कारणामुळे झाला. गेल्या दोन वर्षांपासून भारतात निवडणुकीची धामधूम होती आणि मी अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधी सोहळ्यात व्यस्त होते. पुढच्या वर्षी भारतात येऊन मला शेतकऱ्यांना आणि महिला उद्योजकांना भेटायचे आहे. तसेच धार्मिक स्वातंत्र्याबाबत संवाद साधण्याचीही माझी इच्छा आहे.”







