इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या अंत्यदर्शनासाठी तेहरानमध्ये उसळलेल्या प्रचंड जनसमुदायाने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही आश्चर्याचा धक्का दिला आहे. खामेनेई यांच्याविरोधात इराणमध्ये मोठा जनक्षोभ असल्याची धारणा असतानाच लाखो नागरिक त्यांच्या अंतिम दर्शनासाठी रस्त्यावर उतरल्याचे पाहून ट्रम्प यांनी, “मला वाटले होते लोक त्यांचा तिरस्कार करतात, पण एवढी मोठी गर्दी पाहून मी चकित झालो,” अशी प्रतिक्रिया दिली.
तेहरानमधील इमाम खोमेनी ग्रँड मोसल्ला परिसरासह शहरातील अनेक प्रमुख रस्ते शोकाकुल नागरिकांनी फुलून गेले होते. अनेक जण रडताना, प्रार्थना करताना आणि खामेनेई यांच्या समर्थनार्थ घोषणा देताना दिसले. अंत्यसंस्कार सोहळ्याला धार्मिक नेते, वरिष्ठ राजकीय पदाधिकारी तसेच विविध देशांचे प्रतिनिधीही उपस्थित होते. या अभूतपूर्व गर्दीकडे जगभराचे लक्ष लागले आहे.
हे ही वाचा:
शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून लाखो उकळणारा गजाआड
इन्स्टाग्रामवरील बाल लैंगिक शोषण संबंधित जाहिरातींबाबत मेटाला नोटीस
लोकगायिका आणि पद्मविभूषण डॉ. तीजन बाई यांचे निधन
पुस्तकांतून दहशतवाद्यांचे उदात्तीकरण, जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल संतापले
अमेरिकन माध्यमाशी बोलताना ट्रम्प यांनी या गर्दीबाबत आश्चर्य व्यक्त केले. त्यांनी उपरोधिक स्वरात “कदाचित हे अश्रू खरे नसतील,” अशी टिप्पणीही केली. त्याचवेळी त्यांनी इराणच्या सर्वोच्च नेतृत्वावरही भाष्य करत, अंत्यसंस्कारासाठी सर्व प्रमुख नेते एकाच ठिकाणी जमल्याचे सांगितले आणि “ते सर्व तिथे आहेत, एका कारवाईत सर्वांना लक्ष्य करता आले असते; मात्र आम्ही तसे केले नाही, कारण मग चर्चेसाठी कोणीच उरणार नाही,” असे वक्तव्य केले. त्यांच्या या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.
दरम्यान, इराणकडून ट्रम्प यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध करण्यात आला. इराणच्या अधिकृत भूमिकेतून अमेरिकेच्या भाष्याला असभ्य आणि उचकावणारे संबोधण्यात आले. अंत्यसंस्कारादरम्यान अमेरिकाविरोधी आणि इस्रायलविरोधी घोषणाही देण्यात आल्या. काही वक्त्यांनी ट्रम्प यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्ये केली, ज्यामुळे दोन्ही देशांतील तणाव पुन्हा एकदा अधोरेखित झाला.
विश्लेषकांच्या मते, खामेनेई यांच्या निधनानंतरचा हा अंत्यसंस्कार सोहळा केवळ धार्मिक विधी नसून इराणच्या सत्ताधाऱ्यांसाठी जनसमर्थनाचे शक्तिप्रदर्शन ठरत आहे. दुसरीकडे, अमेरिकेसोबत भविष्यातील चर्चांवर आणि पश्चिम आशियातील राजकीय घडामोडींवरही या घटनाक्रमाचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.







