30 C
Mumbai
Sunday, September 19, 2021
घरदेश दुनियाम्हाडाचे रूप पालटण्यासाठी खर्च होणार बाराशे कोटी

म्हाडाचे रूप पालटण्यासाठी खर्च होणार बाराशे कोटी

Related

राज्यात एकूणच तिजोरीत खडखडाट आहे असे वारंवार सरकारकडून सांगितले जाते. असे असले तरीही लवकरच आता म्हाडा भवनाचा कायापालट होणार आहे. याकामासाठी तब्बल १ हजार २३० कोटी रुपये खर्च होणार आहे. पाच एफएसआयचा वापर करत सध्या पाच मजली इमारतीच्या जागेवर १७ मजली टॉवर बांधण्याचा घाट आता घातलेला आहे. संबंधित इमारत ५० वर्षांपूर्वी वांद्रे पूर्व येथील अदमासे २० हजार चौ.मी जागेवर बांधण्यात आली. परवडणाऱ्या दरात सर्वसामान्यांना घरे उपलब्ध करून देण्याच्या उद्दिष्टाने म्हाडाची स्थापना झाली.

सध्याच्या घडीला मुख्यालयाची इमारत जीर्ण झाली आहे. त्यामुळेच डागडुजी होण्यासारखी नसल्यानेच आता इमारतीचा पुनर्विकास करण्याची गरज निर्माण झाली आहे, असे सांगितले जात आहे. मुंबई मंडळाने या मुख्यालयाच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव तयार केलेला आहे.  सध्याच्या घडीला मुख्यालय १९ हजार २०३ चौ मीटर जागेवर उभे असून आता पाच एफएसआयनुसार पुनर्विकास केला जाणार आहे. म्हणजेच ९६ हजार १९ चौ मीटर क्षेत्रफळ उपलब्ध होणार आहे. पुनर्विकासासाठी मुंबई मंडळाला तब्बल १ लाख २९ हजार ६२६ चौ मीटर इतके क्षेत्रफळ मिळणार आहे.

हे ही वाचा:

सिप्झला मिळणार केंद्राकडून ‘ही’ आर्थिक मदत

राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर जातीवाद वाढला

मोदी सरकारची विद्युत वाहनांच्या दिशेने वेगाने वाटचाल

चिमुकल्या वरदचा खून की नरबळी?

पुनर्विकासासाठी अदमासे १ हजार २३० कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. तसेच काम सुरू झाल्यापासून पाच वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असणार आहे.

मुंबईसारख्या शहरात परवडणारे घर तेही हक्काचे हा स्वप्नवत प्रवास आहे. म्हणूनच हक्काचे घर मिळवण्याच्या स्वप्नासाठी सर्वसामान्यांची भिस्त ‘म्हाडा’वर असते. गेल्या दोन वर्षांत म्हाडाच्या घराची एकही सोडत निघालेली नाही. २००८ पासून सलग १२ वर्षे म्हाडाला सामान्यांचे गृहस्वप्न साकार करत आहे. आता म्हाडा इमारतीलाच पंचतारांकित वलय प्राप्त होणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,409अनुयायीअनुकरण करा
3,170सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा