भारत- पाकिस्तान संघर्षात युद्धबंदी झाली असली तरी चार दिवसांच्या संघर्षात भारताने पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले होते. अशातच पाकिस्तानी लष्कराचे जनरल मुनीर यांना मंगळवारी फील्ड मार्शल पदावर बढती देण्यात आली. त्यांची ही बढती चर्चेचा विषय ठरलेला असतानाचं तुरुंगात असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी असीम मुनीर यांच्यासह विद्यमान सरकारवर टीकास्त्र डागले आहे.
भारतासोबतच्या अलिकडच्या संघर्षादरम्यान मुनीर यांनी पार पाडलेल्या भूमिकेसाठी त्यांना बढती देण्यात आल्याचे सांगण्यात आले. पाकिस्तान सरकारच्या या निर्णयावर देशाचे माजी पंतप्रधान जे सध्या तुरुंगात आहेत इम्रान खान यांनी भाष्य केले आहे. इम्रान खान यांनी म्हटले आहे की, लष्करप्रमुख जनरल मुनीर यांनी फील्ड मार्शलऐवजी स्वतःला राजा ही पदवी द्यावी. कारण सध्या येथे जंगलराज लागू आहे. त्यांनी पुढे म्हटले आहे की, जनरल असीम मुनीर यांना फील्ड मार्शल बनवण्यात आले आहे. तरीसुद्धा, त्यांना राजा ही पदवी देणे निश्चितच चांगले झाले असते. कारण सध्या देशात जंगलराज्य आहे. जंगलात एकच राजा असतो.
फील्ड मार्शल हे पाकिस्तानच्या सैन्यातील सर्वोच्च पद आहे. पाकिस्तान सरकार त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल लष्करप्रमुख यांना हा दर्जा देते. यापूर्वी हे पद अयुब खान यांना देण्यात आले होते. हे पद लष्कराचे जनरल, हवाई दलाचे एअर चीफ मार्शल आणि नौदलाचे अॅडमिरल यांच्यापेक्षा वरचे आहे.
हे ही वाचा..
बांगलादेश अंतरिम सरकारचे प्रमुख मुहम्मद युनूस राजीनामा देणार?
हावर्ड विद्यापीठात आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या प्रवेश बंदीचा निर्णय ट्रम्प प्रशासनाने का घेतला?
वैष्णवी हागवणेचे सासरे, दीर सापडले, पोलिसांनी केली अटक
जेव्हा सिंदूर दारुगोळा बनतो, तेव्हा काय होते ते शत्रूने पाहिले!
ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतासमोर अक्षरशः गुडघे टेकल्यानंतर पाकिस्तान विजयोत्सव साजरा करण्यात धन्यता मानत आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये मुनीर यांनी भारतावर मात केली आहे हे जगाला दाखवण्यासाठी त्यांना ही पदोन्नती देण्यात आल्याचे बोलले जात आहे. मंत्रिमंडळाची बैठक घेतल्यानंतर शाहबाज शरीफ सरकारने मुनीर यांच्या पदोन्नतीला मान्यता दिली.







