भारतातील इराणचे राजदूत म्हणाले की तेहरानने कतार आणि इराकमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर केलेले हल्ले अभूतपूर्व होते आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इशारा दिला की ते पुन्हा कारवाई करण्यास मागेपुढे पाहणार नाहीत. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत राजदूत डॉ. इराज इलाही म्हणाले की, इस्रायलसोबतच्या संघर्षात अमेरिका उडी घेणार याची आम्हाला माहिती होती आणि त्यानुसार तशी तयारी करण्यात आली होती.
“इतिहासात कोणत्याही देशाने अमेरिकेच्या लष्करी तळांना लक्ष्य केलेले नाही. इराणने ते केले आहे. तुम्ही ते एक प्रतिकात्मक प्रत्युत्तर म्हणून बघू शकता. परंतु जर अमेरिकेने ही बेकायदेशीर कृती पुन्हा केली तर त्यालाही तेच प्रत्युत्तर मिळेल,” असे इराणी राजदूत म्हणाले.
अमेरिकेने इराणच्या तीन प्रमुख अणुस्थळांवर हल्ला केल्यानंतर सोमवारी (२३ जून) हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने कतार आणि इराकमधील अमेरिकेच्या हवाई तळांवर क्षेपणास्त्रे डागली. तथापि, बहुतेक क्षेपणास्त्रे रोखण्यात आली आणि कोणतेही मोठे नुकसान झाले नाही.
हे ही वाचा :
फडणवीसांच्या मतदारसंघातील मतदार यादीत ५ महिन्यात ८ टक्क्यांची वाढ!
राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे आमंत्रण, पण उत्तर नाही
फडणवीस राहुल गांधींना म्हणाले, झूठ बोले कौआ काटे, काले कौवे से डरियो!
दरम्यान, काही तासानंतर ट्रम्प यांनी घोषणा केली इस्रायल-इराणमध्ये युद्धविराम झाला आहे. तब्बल १२ दिवसानंतर हे युद्ध थांबले. या युद्धात अनेकांना आपले जीव गमवावे लागले. तथापि, इराणचे राजदूत डॉ. इलाही यांनी स्पष्ट केले की इराण इस्रायलच्या पुढील कोणत्याही कारवाईला निर्णायक प्रत्युत्तर देण्यास तयार आहे.
“(बेंजामिन) नेतान्याहू विश्वासार्ह नाहीत. त्यांनी इराणविरुद्ध लष्करी आक्रमण सुरू केले आणि निवासी क्षेत्रे, रुग्णवाहिका, रुग्णालये देखील लक्ष्य केली. त्यांनी आंतरराष्ट्रीय किंवा मानवतावादी कायद्यांकडे लक्ष दिले नाही. इस्रायलच्या कोणत्याही कृतीला आम्ही प्रत्युत्तर देण्यास तयार आहोत,” असे ते म्हणाले.







