मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघाबद्दल कॉंग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी मोठा आरोप केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात मतदार यादीत ५ महिन्यात ८ टक्के वाढ झाल्याचा आरोप राहूल गांधी यांनी केला आहे. लोकसभा आणि राज्यसभेच्या निकालावरून राहुल गांधी सातत्याने प्रश्न उपस्थित करत आहेत. राहुल गांधींच्या प्रत्येक प्रश्नाला सत्ताधारी नेत्यांनी आणि निवडणूक आयोगाने उत्तर दिले आहे. तरीही राहुल गांधी वारंवार प्रश्न उपस्थित करून जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचे काम करत आहेत.
न्यूज लाँड्रीच्या अहवालाचा दाखला देत राहुल गांधी यांनी ट्वीटकरत आरोप केला की, “मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात मतदार यादीत ५ महिन्यात ८ टक्के वाढ झाली. काही बुथवर २० ते ५० टक्क्यांनी मतदार वाढले. बीएलओंनी अज्ञात व्यक्तींनी मतदान केल्याचे नोंदवले. हजारो मतदारांच्या पत्त्याची पडताळणी झाली नाही”.
ते पुढे म्हणाले, ‘निवडणूक आयोग गप्प का?, कि यात सहभागी आहे. ही मतदारांची एका अर्थी चोरीच’ आहे. म्हणून आम्ही मशीन-रीडेबल डिजिटल मतदार यादी आणि सीसीटीव्ही फुटेज त्वरित प्रसिद्ध करण्याची मागणी करतोय असे राहुल गांधी म्हणाले.
हे ही वाचा :
अबू आझमींनी घासले नाक, म्हणाले “…तो हेतू नव्हता! “
इराण-इस्रायल संघर्ष: “युद्धविराम आता लागू झालाय, कृपया तो मोडू नका!”
दरम्यान, महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका भाजपच्या बाजूने फिक्स करण्यात आल्या होत्या, असा आरोप यापूर्वी त्यांनी केला होता. राहुल गांधींनी ‘Match-Fixing Maharashtra’ या शीर्षकाखाली Indian Express मध्ये एक op-ed (संपादकीय लेख) लिहून, तो एक्सवर शेअर केला. या लेखात त्यांनी “निवडणूक कशी चोरावी?” या नावाने भाजपवर निवडणूक प्रक्रियेच्या अपहरणाचा आरोप केला होता.
राहुल गांधी यांनी पुढील मुद्यांबाबत घेतले होते आक्षेप
१. मुख्य निवडणूक आयुक्तांची नेमणूक केंद्राच्या बाजूने वळवणे:
नवीन कायद्यानुसार पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, आणि विरोधी पक्षनेते यांच्या समितीकडून निवडणूक आयुक्तांची निवड होते. यामध्ये भारताचे सरन्यायाधीश यांना वगळण्यात आल्याबद्दल त्यांनी गंभीर आक्षेप घेतला.
२. बोगस मतदारांची भर, मतदार यादीत लाखो बनावट नावे घातल्याचा आरोप.
३. मतदानानंतर ७.८३ टक्क्यांनी वाढलेला टर्नआउट: हे तब्बल ७६ लाखांचे अतिरिक्त मतदान असून, राहुल गांधींनी यावर प्रश्न उपस्थित केला.
४. फक्त भाजपला विजय हवा तिथेच ‘बोगस मतदान’: भाजपने विशिष्ट मतदारसंघांमध्ये मतदान फसवणूक केल्याचा आरोप.
५. पुरावे लपविणे : या सगळ्या प्रक्रियेचे पुरावे नष्ट केल्याचा आरोप त्यांनी केला होता. दरम्यान, राहुल गांधींचा या सर्व आक्षेपांवर राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सविस्तरपणे एक्सवर उत्तर दिले आहे.
