आषाढी वारीवर वादग्रस्त टिप्पणी करणारे सपाचे आमदार अबू आझमी यांनी अखेर माफी मागितली आहे. त्यांच्या वक्तव्यानंतर भाजपासह अनेकांनी टीका केली होती, त्यांच्यावर कारवाईची मागणी देखील करण्यात आली होती. मंत्री हसन मुश्रीफ यांनी टीका करत अबू आझमींना वारकरी संप्रदाय समजलेला नसून मी भेटल्यानंतर त्यांना समजावून सांगेन, असे म्हणाले होते. याच दरम्यान, त्यांनी अखेर माफी मागितली आहे. अबू आझमी यांनी ट्वीटकरत म्हटले, कोणाच्याही धार्मिक भावना दुखवण्याचा माझा हेतू नव्हता.
आझमी म्हणाले, सोलापुरातील माझे विधान विकृत आणि द्वेषपूर्ण पद्धतीने सादर केले गेले. जर त्यामुळे वारकरी समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी माझे शब्द पूर्णपणे मागे घेतो आणि माफी मागतो. माझा हेतू कधीही कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा नव्हता.
हे ही वाचा :
‘ऑपरेशन सिंधू’: इस्रायलमधून ३२६ भारतीय नागरिक परतले!
इराण-इस्रायल संघर्ष: “युद्धविराम आता लागू झालाय, कृपया तो मोडू नका!”
अमेरिकीच्या हवाई तळांवर हल्ल्यानंतर इराणमध्ये जल्लोष!
ट्रम्प यांनी इस्रायल-इराण युद्ध संपल्याची घोषणा केली; इराणचा मात्र नकार
मी एक निष्ठावंत समाजवादी कार्यकर्ता आहे. मी नेहमीच प्रत्येक धर्म, संस्कृती, सुफी संत आणि त्यांच्या परंपरांचा आदर करतो. वारी परंपरेचे पालन करणाऱ्या सर्व वारकरी बांधवांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करतो. वारीची परंपरा महाराष्ट्राच्या आंतरधर्मीय, समृद्ध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाचा अभिमानास्पद भाग आहे.
ते पुढे म्हणाले, मी वारी पालखीचा उल्लेख फक्त मुस्लिम समुदायाविरुद्ध आणि त्यांच्या हक्कांविरुद्ध होणाऱ्या भेदभावाच्या संदर्भात केला होता. ही कोणत्याही प्रकारची तुलना नव्हती आणि माझा हेतू आणि माझी मागणी कोणत्याही प्रकारे अयोग्य नव्हती.
माझा एकमेव उद्देश सरकारचे लक्ष वेधण्याचा होता. कारण कि त्यांच्या दुटप्पीपणामुळे अल्पसंख्याक समुदायाच्या मनात अशी भावना निर्माण होऊ नये की या देशात त्यांच्यासाठी वेगळे कायदे आहेत. आम्ही उपेक्षित समाजाच्या हक्कांसाठी, आदरासाठी आणि समानतेसाठी लढत राहू, परंतु देशाच्या एकतेला कधीही बाधा येऊ देणार नाही, असे अबू आझमी म्हणाले.
