अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायल आणि इराण यांच्यातील १२ दिवस चाललेल्या युद्धाचे “पूर्ण व संपूर्ण युद्धविराम झाल्याची घोषणा केली. मात्र, इराणने तात्काळ यावर प्रतिक्रीया देत ट्रम्प यांचा दावा फेटाळला आणि स्पष्टपणे सांगितले की, अशा कोणत्याही युद्धविरामावर सहमती झालेली नाही.
ट्रम्प यांची घोषणा १२ दिवसांचे युद्ध संपले
संपूर्ण जगासाठी आनंदाची बातमी! इस्रायल आणि इराण यांच्यात पूर्ण व एकमताने युद्धविराम झाला आहे,” असे ट्रम्प यांनी ट्रूथ सोशलवर पोस्ट केले.
ट्रम्प म्हणाले की, युद्धविराम सहा तासांत सुरू होईल.
इराण आधी युद्धविराम सुरू करेल आणि १२ तासांनी इस्रायलही थांबेल. २४ तासांनंतर युद्ध अधिकृतपणे संपलेले मानले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
इराणने युद्धविराम नाकारला
इराण सरकारच्या प्रवक्त्याने म्हटले की, आम्ही कोणत्याही युद्धविरामावर सही केलेली नाही.” मात्र तेहरानने अमेरिकेच्या मध्यस्थीत कतारमार्फत सुचवलेल्या प्रस्तावावर विचार केला आहे, अशी माहिती Reuters ने दिली, पण अधिकृत सहमती नाकारली आहे.
हे ही वाचा :
महाराष्ट्रात सक्ती फक्त मराठीची, हिंदीची सक्ती नाही!
कतारमधील अमेरिकेच्या तळांवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला
आणीबाणी म्हणजे पत्रकारितेची मुस्कटदाबी
युद्धाची पार्श्वभूमी आणि तणाव
अमेरिका व सहयोगी देशांनी इराणच्या अणुउद्योग केंद्रावर बॉम्बहल्ले केले होते.त्यानंतर इराणने कतार आणि इराकमधील अमेरिकी तळांवर १४ क्षेपणास्त्र डागली.यातील १३ क्षेपणास्त्र अमेरिकेने पाडली आणि एक धोका नसल्यामुळे जाऊ दिले, अशी माहिती ट्रम्प यांनी दिली.
खामेनींचा कडक संदेश
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी ट्रम्प यांच्या घोषणेनंतर म्हटले आहे की, आम्ही कोणालाही त्रास दिलेला नाही आणि कोणाचाही त्रास सहन करणार नाही,” असे म्हणत एक जळता अमेरिकन झेंडा आणि युद्धग्रस्त परिसराचे चित्र पोस्ट केले.
“हे युद्ध वर्षानुवर्षे चालू शकले असते पण ते आता संपले आहे आणि पुन्हा कधीही होणार नाही, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
इस्रायल आणि इराणच्या धैर्याला, शौर्याला आणि बुद्धिमत्तेला सलाम! आणि शेवटी म्हणाले, देवाने इस्रायल, इराण, मध्य पूर्व देश, अमेरिका आणि अवघ्या जगावर कृपा करावी.
ट्रम्प यांनी युद्धविरामाची घोषणा केली असली तरी त्यावर इराणकडून नकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने सध्या स्थिती गोंधळाची आणि अनिश्चिततेची आहे. कदाचित अमेरिकेच्या दबावामुळे शांतता स्थापन करण्याचा प्रयत्न सुरू आहे, पण दोन्ही बाजूंनी विश्वासार्हता आणि उद्दिष्टांमध्ये दरी असल्याचे दिसते.
